Art- Culture : नाशिकच्या तरुणांचे मुंबईत चित्रप्रदर्शन

Colour Palate & Brush
Colour Palate & Brushesakal

नाशिक : येथील प्रवीण चिंतामण खोटरे व रूपेश ठाकरे यांनी काढलेल्या निसर्गचित्रांचे (Nature Paintings) प्रदर्शन (Exhibition) मुंबईतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत (Nehru centre art gallery, mumbai) भरविण्यात आले आहे.‘द स्केप’ या नावाने हे प्रदर्शन येत्या ६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे.आर्ट गॅलरीच्या सहसंचालक नीना रेगे यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे मंगळवारी (ता. ३१) उद्‌घाटन करण्यात आले. (Exhibition of paintings of Nashik aritists in Mumbai Nashik News)

प्रदर्शनात ठेवण्यात आलेली नाशिक परिसर, गंगा घाट, मुंबईतील सीटी स्केप्स (निसर्ग चित्रे), अमूर्त शैली चित्रे, राजस्थान, केरळमधील निसर्ग चित्रे, डॉक यार्ड आदी चित्रे पाहणाऱ्यांना भुरळ पाडणारी आहेत, अशा शब्दांत श्रीमती रेगे यांनी या चित्रांचे कौतुक केले. श्री. खोटरे यांच्या चित्रांचा समावेश इंटर नॅशनल वॉटर कलर प्रदर्शनात झाला असल्याचे ऐकून त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, की नाशिकचे जल रंग काम विशेष आहे. प्रयोगातून विविधता व वेगवेगळे निसर्ग चित्राचे विषय हाताळणी प्रदर्शनात दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Colour Palate & Brush
Nashik : पथदिपांवर आकडे टाकणाऱ्यांना इशारा

तसेच, आपण भविष्यातही जल रंग निसर्ग चित्रणात अधिक कामे करावीत. इतर माध्यमातून चित्र काम हे छानच आहे, पण जल रंगाचे सातत्य ठेवावे असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. श्री. राव, तारामती खोटरे, लक्ष्मण पवार, चित्रकार तुषार देसाई, महेश तळपे, करिष्मा सपकाळे यांच्यासह पुणे आर्टिस्ट ग्रुपचे सदस्य या वेळी उपस्थित होते.

Colour Palate & Brush
Nashik : ग्रंथ तुमच्या दारी; पुस्तकांच्या 21 पेट्या ब्रिस्बेनसाठी रवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com