Nashik News : सप्तशृंगगडावर 42 कुंडांचे अस्तित्व!; पथकाकडून शोध

Local villagers and officials inspecting the cisterns found during the cistern search at wani gad
Local villagers and officials inspecting the cisterns found during the cistern search at wani gadesakal

नाशिक : श्री सप्तशृंग निवासिनी देवी गडावर उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. त्यावर उपाय म्हणून कुंडांच्या पुनरूज्जीवनाचे प्रस्ताव पंधरा दिवसात सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी कुंडांचा शोध घेण्याची सूचना दिली होती. कळवणचे तहसीलदार बी. ए. कापसे यांनी कुंडांच्या शोधासाठी पथक स्थापन केले होते. या पथकाने १०८ कुंडांपैकी ४२ कुंड अस्तित्वात असल्याचा प्रस्ताव दिला आहे. (Existence of 42 water tank at Saptshringagad Search by administration Nashik News)

स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार जिओ टॅगिंग करण्यात आले आहे. पथकामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा, लघू पाटबंधारेचे कनिष्ठ अभियंता, सप्तशृंग गड-नांदुरी-मोहनदरी-गोबापूर आणि नरुळचे ग्रामसेवकांसह तलाठी आदींचा समावेश होता. श्री. कापसे यांच्यासह सप्तशृंगगडाचे सरपंच रमेश पवार, सदस्य संदीप बेनके, ग्रामसेवक संजय देवरे आदींनी कुंडांची पाहणी केली.

गडावर असलेल्या कुंडांशी धार्मिक-अध्यात्मिक-पौराणिक संबंध संलग्न असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पथकातर्फे शोधण्यात आलेल्या कुंडापैकी दत्त, आत्माराम, लक्ष्मी, म्हाष्टी, चक्रतीर्थ, नगरखाना, तांबडी माती, देवकाष्टी, चंडीबाबा, देवझरा, भवरी, नाडगा, उंबऱ्या, नेताळे या कुंडासह गुरुदेव आश्रम आणि गावठाण विहिर पूर्णपणे बुजली असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले आहे. पथकाने सरकारी विहिरीचे खोलीकरण प्रस्तावित केले आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Local villagers and officials inspecting the cisterns found during the cistern search at wani gad
Nashik Crime : ब्लॅकमेल, अत्याचार प्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी!

पथकाच्या निदर्शनास आलेले इतर कुंड-विहिरी-तलाव असे : सूर्य, काली, नवसपूर्ती, पंजाबी, विटाळ, खर्जा, जमुना, सरस्वती, लांब, गणेश, देवनळी, देव, धोंड्या, कोंड्या, उंबर, अष्टकोनी, काजल, उंबरझोती या कुंडासह चांभाऱ्या आणि महादेव, चंबोली (भक्तांगण) विहीर, शिवालय तलाव. दरम्यान, तांबूल तिर्थाची जागा तांबडी असल्याशी सप्तशृंग निवासिनी देवीच्या विड्याशी संबंध स्थानिकांनी जोडलेला आहे. खर्जा कुंडातील पाण्याचे महत्व त्वचाविकार नष्ट करण्यासाठी सांगण्यात येते. कोंड्या आणि धोंड्या हे भावंडांशी निगडित नावे असल्याचे मानले जाते.

Local villagers and officials inspecting the cisterns found during the cistern search at wani gad
Nashik ZP News : कामांना मान्यतेसाठी झेडपीत लगिनघाई; 973 कोटींच्या कामांना चालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com