Nashik News : ABBच्या चौथ्या प्रकल्पाचा विस्तार; नाशिकच्या शिरपेचात तुरा

Sanjeev Sharma, Managing Director, ABB, while inaugurating ABB India's gas insulated switchgear project here.
Sanjeev Sharma, Managing Director, ABB, while inaugurating ABB India's gas insulated switchgear project here.esakal

सातपूर (जि. नाशिक) : एबीबी इंडियाने शुक्रवारी (ता.२४) नाशिकमध्ये त्याच्या नवीन अत्याधुनिक प्रकल्पाचा विस्तार करत गॅस इन्सुलेटेड स्विचगिअरची स्वतःची उत्पादन क्षमता दुप्पट केली. या प्रकल्पात प्रायमरी आणि सेकंडरी जीआयएस उत्पादित केले जातील.

ही उत्पादने वीज वितरण, स्मार्ट शहरे, डेटा सेंटर्स, परिवहन (मेट्रो रेल्वे), बोगदे, बंदर, महामार्ग आणि इतर पायाभूत विकास सुविधा यासारख्या विविध उद्योगांमधील ग्राहकांना सेवा देतील असे कंपनीचे कन्ट्री हेड व व्यवस्थापकीय संचालक संजीव शर्मा यांनी सांगितले.

नाशिकमध्ये एबीबीने गेल्या पाच वर्षांत टप्याटप्याने शेकडो कोटीची गुंतवणूक करत हा चौथा आधुनिक प्रकल्प साकारल्याचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे यांनी सांगितले. यामुळे नाशिकच्या शिरपेचात नवा तुरा रोवला गेला आहे. (Expansion of ABB fourth project pride for Nashik News)

या नव्या प्रकल्पाद्वारे स्मार्ट ग्रीडसाठी लागणाऱ्या उपकरणांची वाढती मागणी पूर्ण होईल. जागतिक व देशांतर्गत बाजारपेठांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक-इन-इंडिया'ला पाठिंबा देण्याप्रती एबीबी इंडियाची बांधिलकी अधिक दृढ होण्यासाठी हा प्रयत्न आहे.

७८००० हजार चौरस फूट क्षेत्रात विस्तार असलेल्या या नवीन प्रकल्पात प्रगत उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. रोबोटिक्सच्या साहाय्याने उत्पादन क्षमता आणि गुणवत्तेत लक्षणीय वाढ होणार आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी एबीबी इंडियाने देशात PrimeGear EM ZXO हे नवीन प्रॉडक्ट देखील लाँच केले आहे. हा इको-फ्रेंडली स्विचगिअर एबीबीच्या SF6-free ecoGISTM प्रणालीवर निर्माण करण्यात येणार आहे, जे हरित, स्मार्ट आणि सुरक्षित भविष्याकडील वाटचालीस हातभार लावते.

यामधील प्रबळ, सुसंगत डिझाइन २०% कमी उष्णता निर्माण करत ऊर्जा बचत करते आणि सुरक्षा वाढवते. ECOGISIM ग्लोबल वॉर्मिंग ची तीव्रता कमी करते. PrimeGearTM ZX0 रिमोट मॉनिटरिंग सक्षम असून पारंपारिक स्विचगियरच्या तुलनेत २५% कमी जागा व्यापते.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Sanjeev Sharma, Managing Director, ABB, while inaugurating ABB India's gas insulated switchgear project here.
Dhule News : निमगूळ येथे कत्तलखान्याकडे गायी वाहून नेणारी वाहने जप्त

सुरक्षित, स्मार्ट व शाश्वत पद्धतीने जगाचे विद्युतीकरण करणारी एबीबी इलेक्ट्रिफिकेशन स्रोतापासून सॉकेटपर्यंत इलेक्ट्रिकल वितरण व व्यवस्थापनामधील जागतिक तंत्रज्ञानात तसेच इलेक्ट्रिफिकेशन व ऑटोमेशनमधील तंत्रज्ञान अग्रणी आहे. जी अधिक शाश्वत व संसाधन कार्यक्षम भविष्याला सक्षम करते. कंपनीचे सोल्यूशन्स वस्तूचे उत्पादन, परिवहन, समर्थन व कार्यसंचालन करण्याच्या पद्धतीला सानुकूल करण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान व सॉफ्टवेअरला एकत्र करतात.

कंपनीचे प्रायमरी व सेकडरीचे उपाध्यक्ष नीरज कुलकर्णी, ऑपरेशन मॅनेजर राहुल भडे, प्रकल्प व्यवस्थापक नितीन सोनबेकर, उत्पादन लाईन व्यवस्थापक योगेश शिरसाठ, उत्पादन व्यवस्थापक नरेंद्र गिरासे, आरएनडी सेन्टर मॅनेजर गणेश घाटे, प्रशासकीय व्यवस्थापक अमित सैनी, एचआर व्यवस्थापक दयानंद कुलकर्णी, टेक्निकल हेड मनोज वाघ आदींसह मान्यवर उपस्थित होते.

"आगामी पाच वर्षांत उद्योग विस्तारासाठी देशभरात एक हजार कोटी रूपयाची गुतवनूक करणार आहे त्यात बडोदा.फरिदाबाद.बॅग्लोर.आणि नाशिक चा समावेश आहे नाशिक मध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आसून सर्वात जास्त निर्यात नाशिक प्रकल्पातुन केली जात आहे याचा विस्तार व क्षमता अधिक करण्यात आम्ही सकारात्मक आहे."

- संजीव शर्मा, कंन्ट्री हेड, व्यवस्थापकीय संचालक, एबीबी.

"नाशिकमधील एबीबी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत पर्यावरणपूरक वीज उपकरणे निर्मित करण्यात अग्रेसर राहिली आहे. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून पर्यावरणपूरक उत्पादन देखील पर्यावरण पूरक फॅक्टरीमध्ये उत्पादित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मेगासिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक वाढल्याने स्विचगिअरची मागणी वाढत आहे."

-- गणेश कोठावदे, सिनिअर व्हॉइस प्रेसिडेंट

Sanjeev Sharma, Managing Director, ABB, while inaugurating ABB India's gas insulated switchgear project here.
RTE Admission : वेळापत्रकाची प्रतीक्षा सुरू; बालकांचे प्रवेश लांबणीवर पडणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com