
नाशिक : स्त्रीधन वगळता सर्वच मालमत्तांवर येणार टाच
नाशिक : घर व पाणीपट्टी थकबाकीदारांच्या आकडा दररोज वाढत असताना थकबाकी वसुलीसाठी ठोस अशी कारवाई होत नाही. कारवाई होत असेल तर अनेक कायदेशीर अडचणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेच्या धर्तीवर नवीन नियमावली अमलात आणली जाणार आहे. त्याअंतर्गत थकबाकीदारांच्या घरातील टीव्ही, फ्रिज, संगणक, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन या महागड्या वस्तू केल्या जाणार आहेत.
कोरोनामुळे महापालिकेच्या (nmc) उत्पन्नात मोठी घट झाली आहे. एकीकडे उत्पन्न मिळत नसताना दुसरीकडे मात्र घर व पाणीपट्टी थकबाकीदारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वसुलीच्या जबरदस्तीने करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने ठोस अशी कारवाई केली नाही मात्र असे असताना थकबाकीदारांना प्रामाणिकपणे थकबाकी आधार करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही.
त्यामुळे घरपट्टी (property tax) थकबाकी साडेचारशे कोटींच्या आसपास, तर पाणीपट्टीची थकबाकी सव्वाशे कोटींच्या आसपास आहे. वसुलीसाठी महापालिकेने अनेकदा आवाहन करूनही थकबाकीदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी कडक धोरण अवलंबिणे गरजेचे असल्याने त्याचाच एक भाग म्हणून प्रशासक रमेश पवार यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर संपत्ती जप्त करण्याची नियमावली करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमावलीनुसार महिलांच्या अंगावरील दागिने वगळता संपत्ती जप्त करण्याचा अधिकार महापालिकेला मिळणार आहे.
हेही वाचा: ४२ कोटींच्या रस्त्याची कामे अडकली
अशी होईल कारवाई
घरपट्टी व पाणीपट्टी न केल्यास २१ दिवसांची नोटीस दिली जाईल. या कालावधीतदेखील कर भरणा न केल्यास घरामधील टीव्ही, वॉशिंग, मशिन, प्रिज, एअर कंडिशनर, कार आदी वस्तू जप्त केल्या जाणार आहेत.
हेही वाचा: मातंग वाड्यातील घरांना आले गटारीचे स्वरूप
Web Title: Expensive Items In The House Seized Due To New Rules Of Mumbai Municipal Corporation In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..