Ajit Pawar : मतदारसंघ विकासासाठी अजित पवारांसोबत; राष्ट्रवादीच्या 3 आमदारांचे स्पष्टीकरण

Adv. Manikrao Kokate, Diliparao bankar, nitin pawar
Adv. Manikrao Kokate, Diliparao bankar, nitin pawar esakal

Ajit Pawar : राज्यातील आताच्या सरकारच्या काळात विकास खुंटला होता. विकासकामांना स्थगिती दिली होती.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. (Explanation of 3 NCP MLAs with Ajit Pawar for constituency development nashik news)

मतदारसंघाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, निफाडचे आमदार दिलीपराव बनकर, कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार या तिघांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. हे तीनही आमदार शपथविधीनंतर श्री. पवार यांना भेटण्यासाठी नाशिकहून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

श्री. झिरवाळ हे ‘नॉट रिचेबल’ होते. त्यांचे कुटुंबीय आणि सहाय्यक यापैकी कुणाकडूनही श्री. झिरवाळ यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आहिरे यांचा भ्रमणध्वनीची रिंग जात होती. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

‘जे जे होई, ते ते पहावे’ असे सांगत असताना ॲड. कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना सोडून चालणार नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, की पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नेतृत्व आणि संघटन या जमेच्या बाजू आहेत. मात्र विधानमंडळात संरक्षण देणारे आमचे नेते आहेत अजित पवार. आमच्याकडून मतदारसंघातील जनतेच्या अपेक्षा खूप आहे. त्या पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मदत होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Adv. Manikrao Kokate, Diliparao bankar, nitin pawar
Ajit Pawar Analysis : दुपारचा शपथविधी! 

राष्ट्रवादी अन् ‘घड्याळ’ नशिबात

राष्ट्रवादी काँग्रेस आणि ‘घड्याळ’ ही निशाणी नशिबात लिहिलेली आहे. त्यामुळे ना पक्षाला, ना नेत्यांना सोडायचे, असे सांगून श्री. बनकर म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगवेगळा पक्ष नाही. मागे-पुढे होत राहते. तरीही मतदारसंघातील विकासकामे होण्यासाठी पक्ष सत्तेत सहभागी होणे आवश्‍यक होते. त्यामुळे आता स्थगिती दिलेली आणि प्रलंबित कामे होण्यासह मतदारसंघातील प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी मदत होईल.

उपमुख्यमंत्री पवार यांची याकामी मदत होईल. ‘‘गेल्या वर्षभरामध्ये विकासकामांसाठी एक रुपया निधी मिळाला नाही. त्यात विकासकामांना स्थगिती देऊन ठेवली. त्यामुळे आदिवासी बहुल कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातील विकास खुंटला होता. आता मात्र विकासकामे होण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत राहणार आहे’’, असे श्री. पवार यांनी सांगितले.

Adv. Manikrao Kokate, Diliparao bankar, nitin pawar
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या बंडामुळे काँग्रेसला काळजी विरोधी पक्षांच्या ऐक्याची; राजकीय फायद्यासाठी विचारमंथन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com