Grapes
sakal
नाशिक: निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात जागतिक बाजारपेठेत नावलौकिक मिळवलेल्या नाशिक जिल्ह्यात आता ‘नमुना तपासणी अहवाल’ हा नवीन वादाचा मुद्दा ठरत आहे. निर्यातदारांकडून नमुना तपासणी अहवाल शेतकऱ्यांपासून लपवून ठेवला जात असल्याचे गंभीर आरोप होत असून, या अहवालावर आधारित द्राक्षाचा दर ठरवला जात असल्याने त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे ‘नमुना तपासणी अहवाल शेतकऱ्यांना देणे बंधनकारक करावे’, अशी मागणी कृषी विभागाकडे जोर धरू लागली आहे.