Nashik News : PFI विरोधातील गुन्ह्याच्या तपासात मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PFI News

Nashik News : PFI विरोधातील गुन्ह्याच्या तपासात मुदतवाढ

नाशिक : समाजात अशांतता निर्माण करणे आणि देश विघातक कारवाया केल्याप्रकरणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या अटक करण्यात आलेल्या संशयितांविरोधातील गुन्ह्याच्या तपासाला मुदतवाढ देण्यात आली आहे. याप्रकरणी सप्टेंबरपासून आठ सदस्यांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणात एटीएसने न्यायालयाकडे ९० दिवसाची मुदतवाढ मागितली होती, मात्र न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. (Extension of time in investigation of crime against PFI Nashik News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik News | अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल मालकावर करावी कारवाई : छगन भुजबळ

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली राज्यात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) नाशिक पथकाने गेल्या २२ सप्टेंबर २०२२ ला मालेगाव, पुणे, बीड व कोल्हापूर येथे छापा टाकून पाच संशयितांना अटक केली होती. या संशयितांच्या संपर्कात असलेल्या सहाव्या संशयितास नोव्हेंबर महिन्यात अटक केली. यानंतर आणखी दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे.

या गुन्ह्याचा तपास सुरू असून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत संपल्याने विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी (ता.२०) युक्तिवाद करत मुदतवाढ देण्याची विनंती केली. बचाव पक्षाने त्यास हरकत घेतली. त्यानंतर न्यायालयाने एटीएसला तपासासाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

हेही वाचा: Nashik News: अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंग रोडबरोबरच उड्डाणपूल; ‘Resilient India’चा सर्वेक्षण अहवाल