Nashik News: अपघात नियंत्रणासाठी बाह्य रिंग रोडबरोबरच उड्डाणपूल; ‘Resilient India’चा सर्वेक्षण अहवाल

 flyover
flyoveresakal

नाशिक : औरंगाबाद महामार्गावर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रेझिलीएंट इंडिया कंपनीने सर्वेक्षण करून महापालिकेला अहवाल सादर केला आहे.

त्यात शहरात बाह्य रिंग रोडची नितांत आवश्यकता असल्याचे नमूद करताना द्वारका ते दत्तमंदिर व मिरची चौक ते नांदूर नाका दरम्यान उड्डाणपुलाची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. त्याचबरोबर शहरातील सिग्नल वर सीसीटीव्ही लावून ई- चलन लागू करण्याचे अहवालात स्पष्ट केले आहे. (Flyover along with outer ring road for accident control survey report of Resilient India Nashik nmc News)

रेझिलीएंट कंपनीने मंगळवारी (ता. २०) महापालिकेला अहवाल सादर केला. त्यापूर्वी पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कंपनीला २८ अपघात ब्लॅक स्पॉटचा अहवाल सादर केला होता. या स्पॉटवर दीड महिना सर्वेक्षण करण्यात आले. २८ पैकी २६ ब्लॅक स्पॉटवर सर्वेक्षण झाले. सर्वेक्षण अहवालामध्ये दोन प्रकारच्या शिफारशी केल्या असून, यात तत्काळ करण्याच्या उपाययोजना व भविष्यकालीन उपाययोजनांचा समावेश आहे.

शहरातील २८ ब्लॅक स्पॉटवर अपघात कमी करण्यासाठी गतिरोधक, व्हाइट स्ट्रीप, झेब्रा क्रॉसिंग दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना, दृश्यमानता वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरात ११४ किलोमीटर लांबीचे विविध राष्ट्रीय व राज्य महामार्ग असून, या मार्गावरील वाहतूक शहराबाहेरून बाह्य रिंगरोडच्या माध्यमातून वळविण्याची शिफारस केली आहे. द्वारका चौक ते दत्तमंदिर व औरंगाबाद रोडवरील मिरची चौक ते नांदूर नाका या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२३ ब्लॅक स्पॉटवर सिग्नल बसविण्याच्या सूचना देताना सिग्नलवर सीसीटीव्ही बसवावे व या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर ई-चलन पद्धत लागू करावी. गडकरी चौकात म्हाडाची भिंत अतिक्रमित असल्याचे आढळले आहे. चौकातील सिग्नलवर गतिरोधक, पदपथ बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे मुंबई नाक्यावरील वाहतूक बेट कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, मुख्य चौकांमध्ये हायमास्ट बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

 flyover
Nashik News : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 16 लाखाचा गुटखा जप्त

अतिवेगाने मृत्यूचे प्रमाण अधिक

सर्वेक्षण करताना मागील तीन वर्षाच्या अपघातांचा अभ्यास करण्यात आला. अपघातात पादचारी व दुचाकीस्वारांच्या अपघातांचे प्रमाण ९३ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले. २०१९ व २० मध्ये दुचाकीस्वारांचे मृत्यूचे प्रमाण ५५ टक्के, तर पादचारी मृत्यू २७ टक्के झाले आहेत. २०२० व २१ मध्ये दुचाकीस्वार ६२, तर पादचारी २६ टक्के व २०२१ व २२ मध्ये अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण ६५ टक्के, तर पादचारी मृत्यू २८ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे अपघात मोठ्या व अडथळामुक्त रस्त्यांवर झाल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.

सूचनांची अंमलबजावणी आवश्यक

अहवालात अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या सूचना केल्या आहे. या सूचनांची अंमलबजावणी झाल्यास २० टक्क्याने अपघातांची संख्या कमी होईल, असा दावा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव चौबे यांनी केला आहे. तसेच बाह्य रिंगरोड व उड्डाणपुलांची निर्मिती झाल्यास अपघाताचे प्रमाण ५० टक्के कमी होईल, असाही दावा करण्यात आला आहे.

"रेझिलीएंट इंडिया कंपनीने महापालिकेला सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना केल्या जातील. औरंगाबाद महामार्गावर उड्डाणपुलाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाला दिला आहे."-शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.

 flyover
Nashik News | अपघातग्रस्त खासगी ट्रॅव्हल मालकावर करावी कारवाई : छगन भुजबळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com