NEET परीक्षेसाठी अर्जासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NEET Exam Extension

NEET परीक्षेसाठी अर्जासाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ

नाशिक : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्‍या (medical degree courses) प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावर नॅशनल इलिजिब्‍लीटी कम एंट्रान्‍स टेस्‍ट (NEET) २०२२ परीक्षेकरीता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुदत संपत असतांना ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला नॅशनल टेस्‍टींग एजन्‍सी (NTA) यांच्‍यातर्फे मुतदवाढ दिलेली आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना १५ मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे. (Extension till May 15 for application for NEET exam Nashik Education News)

एमबीबीएस (MBBS), बीडीएस (BDS) या अभ्यासक्रमांसोबत बीएएमएस (BAMS), बीयुएमएस (BUMS), बीएचएमएस (BHMS), फिजिओथेरेपी (Physiotherapy) व अन्‍य शिक्षणक्रमांसह बी.एस्सी (Nursing) या शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी नीट परीक्षा घेतली जाते. नीट २०२२ करीताच्‍या प्रक्रियेअंतर्गत अर्ज भरण्याची मुदत संपत असतांना, एनटीएच्‍या वतीने मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे. त्‍यानुसार आता विद्यार्थ्यांना १५ मेच्‍या रात्री नऊपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. तर याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनीटांपर्यंत निर्धारीत शुल्‍क भरण्याची मुदत असणार आहे.

हेही वाचा: ‘भोंगा‘यण प्रकरणी पोलिसांकडून दणका; मालेगावी भोंग्याविना अजान

नीट २०२२ परीक्षेच्‍या माध्यमातून देशभरातील आर्मड फोर्सेस मेडिकल सर्‍व्‍हिसेस येथील बी.एस्सी (नर्सिंग) शिक्षणक्रमाकरीता विद्यार्थिनींची निवड केली जाणार आहे. पुणे, मुंबई, कलकत्ता, दिल्ली, लखनौ, बंगळूरु या ठिकाणच्‍या इन्‍स्‍टिट्यूटमध्ये उपलब्‍ध एकूण २२० जागांकरीता नीटच्‍या कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा: Nashik : उन्हाळ्यात एसटीची दिवाळी. पाहा PHOTOS

परीक्षा १७ जुलैला

नीट २०२२ परीक्षा येत्‍या १७ जुलैला देशभरात घेतली जाणार आहे. ऑफलाईन पद्धतीने (पेन व पेपर मोड) होणारी ही परीक्षा तेरा भाषांमध्ये घेतली जाणार आहे. इंग्रजी, हिंदीसह मराठी, गुजराथी, उर्दु या भाषांचा समावेश आहे.

Web Title: Extension Till May 15 For Application For Neet Exam Nashik Education News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top