Nashik Crime: पंचवटीतील दाम्पत्याविरोधात खंडणीचा गुन्हा; नातलगास 10 टक्क्याने पैसे देत धमकावले

शहरात सुरू असलेल्या अवैध सावकाराला आळा बसलेला नाही, हेच या घटनेतून सिद्ध झाले आहे.
Money Fraud
Money Fraudesakal
Updated on

Nashik Crime : नातलग असलेल्या महिलेला दहा टक्के व्याजाने आठ लाखांची रक्कम दिल्यानंतर, व्यासासह १९ लाखांची परतफेड केली. मात्र तरीही संशयित दाम्पत्याने कर्जदार महिलेकडे आणखी १० लाखांची मागणी करीत धमकावले.

याप्रकरणी पीडित महिलेने पंचवटी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार संशयित दाम्पत्याविरोधात खंडणीसह अवैध सावकारी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Extortion case against Panchvati couple Threatened relatives to pay 10 percent Nashik Crime)

कांचन संदिप चावडा, संदिप जगदीश चावडा (रा. न्यू लुक ब्युटीपार्लर, अनुसयानगर, पेठरोड, पंचवटी) अशी संशयित दाम्पत्यांची नावे आहे.

उषा दीपक मकवाना (रा. अरिना अपार्टमेंट, मधुबन कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, घरगुती आर्थिक विवंचनेतून त्यांनी नातलग असलेल्या संशयित चावडा दाम्पत्याकडून ८ लाख रुपयांची रक्कम १० टक्के व्याजाने घेतले होते.

संशयित चावडा कुटुंबीयाचा ब्युटीपार्लरचा व्यवसाय आहे. कर्जदार मकवाना यांनी टप्प्या-टप्प्याने ८ लाख आणि त्यावरील १० टक्के व्याजाने १९ लाख ४१ हजार रुपयांचा परतावा केला. मात्र, संशयित चावडा दाम्पत्याने मकवाना यांच्याकडे आणखी १० लाख रुपयांची मागणी केली.

याबाबत, मकवाना यांना शिवीगाळ करुन कोऱ्या स्टॅम्प पेपरसह कोरे धनादेश आणि फ्लॅटच्या कागदपत्रांची झेरॉक्सही ताब्यात घेतली. उषा मकवाना यांच्या पतीविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही संशयितांनी दिली.

सदरचा प्रकार ६ ऑगस्ट २०१७ ते २८ जुलै २०२३ या दरम्यान मखमलाबाद नाका येथील पेठकर प्लाझा या ठिकाणी झाला आहे. याप्रकरणी संशयित चावडा दाम्पत्याविरोधात पंचवटी पोलिसांत खंडणीसह सावकारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Money Fraud
Nandurbar Crime : गोळीबार घटनेतील 6 आरोपींना अटक; 2 गटांतील मृतांसह 14 जणांविरुद्ध गुन्हा

शहरात अवैध सावकारीवर शिक्कामोर्तब

गेल्या २०२२ या वर्षात अवैध सावकारीच्या जाचामुळे आत्महत्ता केल्याच्या एकापेक्षा अनेक घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांसह उपनिबंधक कार्यालयाकडून याबाबत पावले उचलण्यात आली होती. परंतु तरीही शहरात अवैध सावकारी सुरू असल्याचेच या घटनेमुळे समोर आले आहे.

गेल्या वर्षी सातपूरमध्ये खासगी सावकारीला कंटाळूनच तरुणाने तर, डिसेंबर २०२२ मध्ये पाथर्डी फाटा परिसरात एका तरुण दाम्पत्याने खासगी सावकारांच्या धमक्यांमुळे आत्महत्या केली. तसेच, सातपूरमध्येही दोन भावांसह वडिलांनी आत्महत्या केल्याने तर संपूर्ण शहर हादरले होते.

यासह उपनगर, पंचवटीत वसुलीसाठी अवैध सावकारांनी धमकावल्याचे प्रकार घडले आहेत. याबाबत पोलिसांसह निबंधक कार्यालयाने चौकशी करून गुन्हेही नोंदविले. मात्र तरीही शहरात सुरू असलेल्या अवैध सावकाराला आळा बसलेला नाही, हेच या घटनेतून सिद्ध झाले आहे.

Money Fraud
Mumbai Crime News: कोण आहे गँगस्टर छोटा शकीलचा शूटर?, २५ वर्षांनंतर ठाण्यात अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com