कथित पर्यावरणप्रेमी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल; ठेकेदाराकडे मागत होता दरमहा 20 हजारांची खंडणी | Extortion case filed against alleged environmentalist 20 thousand extortion per month demanded from nmc contractor nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime: कथित पर्यावरणप्रेमी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल; ठेकेदाराकडे मागत होता दरमहा 20 हजारांची खंडणी

Nashik Crime : शहरात परवानगीनुसार वृक्षतोड करण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदारास महापालिकेकडे ऑनलाईन तक्रार न करण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांची खंडणीची मागणी करणाऱ्या कथित पर्यावरणप्रेमीविरोधात गंगापूर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेषत: संशयित खंडणीखोराने याबाबतची नोटरी केली होती. त्याची एक प्रत त्याने ठेकेदाराला देताच, त्याने पोलीसात धाव घेत फिर्याद दिली. (Extortion case filed against alleged environmentalist 20 thousand extortion per month demanded from nmc contractor nashik Crime)

दीपक त्र्यंबक जाधव (४०, रा. नाशिक) असे खंडणीखोर कथित पर्यावरणप्रेमीचे नाव आहे. नितीन प्रभारक कोठावदे यांनी गंगापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठावडे यांनी परवानगीनुसार वृक्षतोड करण्याचा महापालिकेचा ठेका घेतला आहे.

संशयित जाधव याने कोठावदे यांना महापालिकेकडे ऑनलाईन तक्रार न करण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांची मागणी केली. त्यासंदर्भात संशयित जाधव याने नोटरीही केली. या नोटरीची एक प्रत त्याने कोठावदे यांनाही दिली.

त्याचआधारे कोठावदे यांनी गंगापूर पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून गंगापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी संशयित जाधव याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सदरचा गुन्हा दाखल करून जाधव यास अटक करण्यात आली आहे