Nashik Crime: लॅबचे साहित्य पुरविण्याच्या नावाखाली 37 लाखांना गंडा; मोदी दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

crime
crimeesakal
Updated on

Nashik Crime : फार्मा इंडस्ट्रीला लॅबचे साहित्य पुरविण्यासाठी ३९ लाख रुपये घेतले. मात्र, दोन लाखांचे साहित्य देत एका महिला व्यावसायिकेला ३७ लाखांना गंडा घालणाऱ्या संशयित मोदी दांपत्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Extortion of 37 lakhs in name of providing lab materials Case registered against Modi couple Nashik Crime)

राजेंद्रदुर्गा प्रसाद मोदी (५०), अनिता राजेंद्रदुर्गा मोदी (५५, रा. नाशिक), अशी संशयितांची नावे आहेत. सायली सुनील चिडे (रा. टागोरनगर, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी २०२० मध्ये नोकरी सोडल्यानंतर नातलगांच्या मदतीने फार्मा इंडस्ट्री सुरू केली.

ऑनलाइन स्वरूपात त्यांनी लॅब सामग्री खरेदीसाठी शोध घेतला असता, त्या वेळी त्यांची संशयित राजेंद्र मोदी यांच्याशी ओळख झाली. सामग्रीची रक्कम ३९ लाख ३२ हजार रुपये असल्याने फिर्यादींनी १ कोटी ४५ लाखांचे कर्ज घेतले.

crime
Jalgaon Crime News : संगणकीय चक्री जुगारावर छापा; सिंधी कॉलनीत पोलिसांची कारवाई

कर्ज मंजुरीनंतर ७२ टक्के रक्कम मोदी यांच्या बँक खात्यात कर्ज देणाऱ्या बँकेतून जमा झाली. त्यानंतर संशयिताने २ लाख ६२ हजारांची सामग्री दिली. उर्वरित साहित्य अद्यापपर्यंत सायली चिडे यांना दिली नाही.

फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. ‘तुमचे पैसे मिळणार नाहीत. सामानही मिळणार नाही. जे करायचे ते करा’, असे मोदी यांनी सायली चिडे यांना सांगितले.

त्यावरुन फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे.

crime
Pune Crime : बनावट शस्त्र परवान्यातून नोकरी मिळवणाऱ्या आठ सुरक्षारक्षकांना केली अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com