Jalgaon Crime News : संगणकीय चक्री जुगारावर छापा; सिंधी कॉलनीत पोलिसांची कारवाई

Jalgaon Crime News : संगणकीय चक्री जुगारावर छापा; सिंधी कॉलनीत पोलिसांची कारवाई
Updated on

Jalgaon Crime News : सिंधी कॉलनी, भाजी मार्केटमध्ये एका दुकानात पडदा लावून संगणकावर चक्री सोरट प्रकाराचा जुगार अड्डा चालवला जात होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून रोख रकमेसह, संगणक आणि जुगाराचे इतर साहित्य जप्त करुन तिघांना अटक केली आहे. (Raid on Computerized Cyclic Gambling in jalgaon crime news)

याबाबत श्री. गावित यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्याने परीविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील गोपाळ पाटील, सचिन साळुंखे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सचिन पाटील, योगेश बारी आदींचे पथक संबंधित दुकानात पोचले.

तेथे तीन जण टीव्ही स्क्रीनवर गोल चक्री माऊसच्या आधारे ऑपरेट करीत असताना, तर चार ते पाच जण हातात पैसे घेवून उभे असल्याचे आढळून आले.

Jalgaon Crime News : संगणकीय चक्री जुगारावर छापा; सिंधी कॉलनीत पोलिसांची कारवाई
Jalgaon Crime News : नेरीनाका येथे जुगार अड्ड्यावर छापा; 1 लाख 67 हजारांच्या रोकड जप्त

मात्र, पोलिस आल्याचे पाहताच पैसे घेवून उभे असलेले चार ते पाच जण पळून गेले. तर टीव्ही स्क्रीन ऑपरेट करणारे संतोष नानकराम रामचंदाणी (वय ३२, रा. कंवरनगर), वसीम शहा शब्बीर शहा (वय ३२, रा. तांबापुरा), नीलेश दिनेश सरपटे (वय ३३, नवल कॉलनी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

या ठिकाणाहून रोख रकमेसह सीपीयू, मॉनिटर, की बोर्ड, माऊस असा एकूण ४७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी नाईक सचिन साळुंखे यांच्या फिर्यादीवरू एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Jalgaon Crime News : संगणकीय चक्री जुगारावर छापा; सिंधी कॉलनीत पोलिसांची कारवाई
Dhule Bribe Crime : ‘तहसील’मधील खासगी पंटर रितेश ‘एसीबी’च्या ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.