वणी- राज्यातील शक्तिपीठांपैकी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सवाला शनिवार (ता. ५)पासून प्रारंभ होणार आहे. चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ ते १२ एप्रिलदरम्यान सप्तशृंगगडावर जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. .या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाच्या बस भाविकांची वाहतूक करणार असून, नांदुरी ते सप्तशृंगगड तसेच नाशिकसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारांतून थेट सप्तशृंगगडापर्यंत भाविकांच्या वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यात भाविकांच्या सुरक्षित प्रवासासह नांदुरी व सप्तशृंगगडावरील स्थानकावर भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान १२० बस व जिल्हाभरातून १३० बस गडाकडे धावणार आहेत..सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. विशेषतः नाशिक जिल्ह्यासह खानदेश, पुणे, नगर, मुंबई, औरंगाबादसह गुजरातमधून चैत्रोत्सवात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते. .भाविकांची संख्या लक्षात घेऊन यात्रोत्सवाच्या काळात जिल्हा प्रशासनाने गडावर येण्या-जाण्यासाठी खासगी वाहनांना बंदी केली आहे. भाविकांना वेळेत व सुलभ दर्शन व्हावे, यासाठी एसटी प्रशासनाने अगोदरपासूनच जादा बसचे नियोजन केले आहे. यात्रा कालावधीसाठी परिवहन महामंडळाने नांदुरी येथे गडाच्या पायथ्याशी व गडावरील जलशुद्धीकरण केंद्राजवळ तात्पुरते वाहतूक केंद्र तयार करण्यात येत आहे. नाशिक येथे नवीन सीबीएस (ठक्कर) बसस्थानकात यात्रा वाहतूक केंद्र असणार आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, कळवण आगाराचे व्यवस्थापक राहुल बोरसे, वाहतूक अधीक्षक सुरेश पवार यांनी दिली..असे असेल बसचे नियोजननांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान ५ एप्रिलला ८० बस, ६ व ७ एप्रिलला १०५ बस, ८ ते १३ एप्रिलपर्यंत रोज १२० बस भाविकांची वाहतूक करतील. .इतर आगारांतील बसचे नियोजननवीन सीबीएस (नाशिक) ते सप्तशृंगगड : ६५ बस, मालेगाव ते सप्तशृंगगड : ४५ बस. मनमाड ते सप्तशृंगगड : १५ बस. सटाणा ते सप्तशृंगगड : ५ बस. याप्रमाणे एकूण १३० बस थेट आगारातून गडापर्यंत वाहतूक करतील. गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार प्रासंगिक जादा बसचे नियोजनही करण्यात येईल. याशिवाय धुळे, जळगाव जिल्ह्यातील आगारातूनही साठ ते सत्तर बसचे नियोजन आहे..भाविकांसाठी सुविधा व सुरक्षाभाविकांसाठी नांदुरी (पायथा) व गडावर वॉटरप्रूफ निवारा, प्रतीक्षा शेडमद्यसेवन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच होणार नेमणूक, दिवाबत्तीची पुरेशी व्यवस्था, नांदुरी येथे जनरेटरमहाविकास आघाडीचे प्रवाशांसाठी नांदुरी व गडावरील स्थानकात दोन टॅंकरने स्वच्छ पाणीमहाविकास आघाडीचे नांदुरी व सप्तशृंगगड येथील वाहनतळावर इंधन देखभाल व दुरुस्तीसाठी कर्मचारीमहाविकास आघाडीचे -क्रेनची व्यवस्था, त्यासाठी तीन सत्रांत कर्मचारी नियुक्ती.महाविकास आघाडीचे -चालकांना मार्गदर्शनासाठी यूटर्न, गणपती टप्पा, मंकी पाइंट येथे महामंडळाचे विशेष कर्मचारी.चैत्र पौर्णिमा संपल्यानंतर श्री सप्तशृंगगड ते खानदेशासाठी जादा बस..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.