Nashik : श्रावण सोमवारी एसटीकडून जादा बसगाड्या | latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSRTC latest marathi news

Nashik : श्रावण सोमवारी एसटीकडून जादा बसगाड्या

नाशिक : धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानल्‍या जाणाऱ्या श्रावण महिन्‍याला सुरवात होत आहे. या कालावधीत त्र्यंबकेश्‍वरला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.

विशेषतः सोमवारी भाविक प्रवाशांची वाढीव संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (MSRTC) एसटीबसगाड्यांचे नियोजन आखले जात आहे. तिसऱ्या श्रावण सोमवारी शहरातील विविध भागातून बसगाड्या सोडण्याचेही विचाराधीन आहे. (Extra buses from ST on Shravan from Monday nashik latest marathi news)

दरवर्षी श्रावण महिन्‍यात त्र्यंबकेश्‍वर भाविकांची मांदियाळी असते. जिल्‍हाभरासह राज्‍य व देशातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. या पार्श्वभूमिवर भाविकांच्‍या सुविधेसाठी एसटी महामंडळाकडून जादा बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या जात असतात.

श्रावण महिन्‍याला सुरवात होत असताना महामंडळाकडून यंदाच्‍या जादा बसगाड्यांचे नियोजन आखले जात आहे. महिनाभर भाविकांच्‍या सुविधेसाठी जादा बसगाड्या उपलब्‍ध असणार आहे. त्‍यातही सोमवारी अतिरिक्‍त बसगाड्या सोडल्‍या जातील.

हेही वाचा: आंतरजातीय विवाह केल्याने युवकाला बेदम मारहाण

असे आहे नियोजन

पहिल्‍या, दुसऱ्या व चौथ्या श्रावण सोमवारी प्रत्‍येकी पन्नास अतिरिक्‍त बसगाड्या सोडण्याचे नियोजन आहे.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरीसाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता तिसऱ्या श्रावणी सोमवारी अडीचशे जादा बसगाड्या सोडण्याबाबत नियोजन सुरु आहे. या दिवशी नाशिक शहरासह नाशिक रोड व अन्‍य उपनगरीय भागांतून बसगाड्या उपलब्‍ध करून दिल्‍या जाणार आहेत.

हेही वाचा: मालेगाव पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

Web Title: Extra Buses From St On Shravan From Monday Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikMSRTCshravan