मालेगाव पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर

Provincial Magistrate Vijayanand Sharma, Tehsildar Chandrajit Rajput while announcing the release of Panchayat Samiti reservation.
Provincial Magistrate Vijayanand Sharma, Tehsildar Chandrajit Rajput while announcing the release of Panchayat Samiti reservation.esakal

मालेगाव (जि. नाशिक) : येथील पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (Panchayat Samiti Election) १८ गणांसाठी गुरुवारी (ता.२८) आरक्षण सोडत काढण्यात आली.

प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसिल कार्यालय सभागृहात झालेल्या बैठकीत तहसिलदार चंद्रजीत राजपूत यांनी सोडतीनंतर आरक्षण जाहीर केले. १८ गणांपैकी ९ गण सर्वसाधारण राखीव झाले आहे. यात चार गण महिला सर्वसाधारण राखीव आहेत. (Malegaon Panchayat Samiti Announces Reservation draw nashik Latest Marathi News)

श्री. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार राजपूत, अव्वल कारकून नितीन विसपुते, राहुल देशमुख यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली. श्री. राजपूत यांनी सोडतीसंदर्भात उपस्थितांना माहिती दिली.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या प्रमाणे आरक्षण काढण्यात आले. एकूण १९ पैकी नऊ जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली.

बैठकीला माजी पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, समाधान पाटील, केवळ पवार, प्रशांत निकम, रवी पवार, प्रमोद म्हसदे, हिरामण कचवे, प्रशांत शिरसाठ, कल्पेश पाटील, भाऊसाहेब बच्छाव, अनिल सूर्यवंशी, सुभाष पाटील, अनिल वाघ, महेश शेरेकर आदींसह राजकीय पक्षांचे पदाधिकारी, इच्छूक उमेदवार उपस्थित होते.

आरक्षणाची स्थिती पाहता सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला, ओबीसी व ओबीसी महिला अशा एकूण १३ जागांवर चुरशीची लढत होईल. प्रमुख मातब्बर इच्छुक असलेले कळवाडी, निमगाव व सौंदाणे हे गण आरक्षित झाल्याने प्रमुख इच्छुकांची पंचायत झाली आहे.

दाभाडी व चिंचावड गट ओबीसी महिला राखीव झाल्याने येथे प्रमुख नेते आपल्या धर्मपत्नींना वा सुनेला निवडणूक रिंगणात उतरवतील. सर्वसाधारण महिला राखीव असलेल्या चार जागांवरही चुरशीची लढत होईल.

सर्वसाधारण राखीव झालेल्या पाच गणात इच्छुकांची झुंबड असेल. तालुक्यातील सहा गट राखीव झाल्याने जिल्हा परिषदेसाठी इच्छूक असलेले अनेक नेते गटाऐवजी गणाकडे आपला मोर्चा वळवतील.

Provincial Magistrate Vijayanand Sharma, Tehsildar Chandrajit Rajput while announcing the release of Panchayat Samiti reservation.
पिटीसी समोरील वादग्रस्त करोडोची जागा महापालिकेच्या हातून जाण्याची शक्यता

मालेगाव पंचायत समिती आरक्षण असे :

सर्वसाधारण : गाळणे, झोडगे, वडेल, टाकळी, जळगाव निं. (५ जागा)

सर्वसाधारण महिला : अस्ताने, रावळगाव, अजंग, येसगाव बुद्रुक (४ जागा)

ओबीसी (ना.म.प्र.) : वडगाव, करंजगव्हाण (२ जागा)

ओबीसी (महिला) : चिंचावड, दाभाडी (२ जागा)

अनुसूचित जमाती : कळवाडी, सौंदाणे (२ जागा)

अनुसूचित जमाती (महिला) : चिंचगव्हाण, चंदनपुरी (२ जागा)

अनुसूचित जाती (महिला) : निमगाव (१ जागा)

--------------------------------------------------

एकूण - १८ जागा

Provincial Magistrate Vijayanand Sharma, Tehsildar Chandrajit Rajput while announcing the release of Panchayat Samiti reservation.
आंतरजातीय विवाह केल्याने युवकाला बेदम मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com