

CM Fadnavis Makes Strong Remarks On Kumbh Mela At Nashik Rally
Esakal
नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सभा झाली. या सभेत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. महापालिकेत गुंतवणूक किती आणली असं विचारणाऱ्यांनाही फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. नाशिकमध्ये ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणल्याचं त्यांनी सांगितलं. तर महापालिकेच्या ५४ एकर जागेचा कमर्शियल वापर करण्यासाठी मनसेची सत्ता असताना ठराव मंजूर केला गेला होता. पण आम्ही त्याचा कमर्शियल वापर केला नाही तर तिथं हिरवीगार झाडं लावली असंही फडणवीस म्हणाले.