मालेगाव- विभागीय आयुक्त असल्याचे बनावट नियुक्तीपत्र दाखवून लवकरच नाशिकचा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होणार असल्याची बतावणी करून शासकीय जमिनीवर कमी किमतीत रो हाऊस बांधून देण्याचा बनाव करणारा तोतया पोलिसांनी जेरबंद केला आहे. रिंकल नरेश रजक ऊर्फ अब्दुल रहेमान (वय ३७, रा. नाहर वाली, माता रोड, ग्वालियर) असे संशयिताचे नाव आहे.