नाशिक: सातपूर येथील अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर बनावट कागदपत्रे अपलोड करीत प्रमाणपत्रे मिळवीत बँकांकडे कर्ज प्रकरणे करून संशयितांनी संगनमताने सुमारे चार लाखांचे अनुदान लाटले असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संशयितांविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. गौरव शंकर मंचरे (रा. राहाता, जि. अहिल्यानगर), राहुल बाळासाहेब चोळके (रा. अहिल्यानगर), विश्वजित गांगुर्डे, मनोज जगताप, विश्वास जगताप अशी संशयितांची नावे आहेत.