

Ashok Kharat Property
Esakal
अंकज्योतिष असलेला स्वयंघोषित 'कॅप्टन' अशोक खरात याच्याभोवती विशेष तपास पथकाने फास आवळला असून, शुक्रवारी (ता. २०) आठ तासांपेक्षा अधिक तास त्याची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान, अशोक खरात याच्याकडे खंडणी मागणारा व ती न मिळाल्यानेच कार्यालयातील लैंगिक शोषणाचे बिंग फोडणारा 'ऑफिसबॉय' नीरज जाधव यास 'एसआयटी' च्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. दरम्यान, महिलांचे वेगवेगळ्या विधींच्या नावाखाली लैंगिक शोषण केल्याच्या ५८ नव्हे, तर शेकडो व्हिडिओ क्लिप असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.