

Nashik Fraud Case Fake Godman Promises 15 Crore Money Rain Cheats Victims of 10 Lakh 95 Thousand and Gives Waste Notes
sakal
अभोणा/नाशिक : पैशांचा १० पट परतावा देण्याचे आणि अघोरी पूजेद्वारे ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून निवृत्त महापालिका कर्मचाऱ्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची १० लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पिंपळे खुर्द (ता. कळवण) येथील तथाकथित भोंदूबाबा हिराचंद शिवाजी बर्डे ऊर्फ राजूबाबाला अभोणा पोलिसांनी अटक केली असून, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बर्डेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध अभोणा पोलिस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.