नाशिक: आपल्याकडे असलेली अघोरी शक्ती लग्नानंतर अल्पवयीन मुलीला मिळेल, असे भासवून अल्पवयीन मुलीवर विवाहासाठी दबाव टाकत तिचा विनयभंग केला. पीडितेच्या वडिलांनी विवाहाला विरोध केला असता, त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संशयित भोंदूबाबासह त्याचा मित्र, आई आणि पीडितेच्या आईविरोधात नाशिक रोड पोलिसांत पॉक्सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.