Fake Medical Certificate Case : गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेची चौकशी

Fake Medical Certificate case
Fake Medical Certificate caseesakal

नाशिक : बहुचर्चित नाशिक ग्रामीण पोलिस दलातील आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांप्रकरणी नाशिक तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परंतु, कार्यक्षेत्रात नसतानाही दाखल करण्यात आलेला हा गुन्हा काही आठवड्यांपूर्वी नाशिक शहर हद्दीतील आडगाव पोलिसात वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याबाबतच्या प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहेत. (Fake Medical Certificate Case inquiry into process of filing case nashik news)

दरम्यान, सदरील गुन्ह्याचा तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ हे करीत आहेत. गेल्या ऑगस्ट २०२२ मध्ये नाशिक तालुका पोलीस ठाण्यात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी नाशिक ग्रामीण मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक, जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन यांच्यासह जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, व प्रमाणपत्र देणाऱ्या २१ पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा शहर आयुक्तालय हद्दीतील पोलिस ठाण्यात दाखल होणे अपेक्षित होते. परंतु, तत्कालीन अधीक्षकांनी याप्रकरणी गुन्हा नाशिक तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला. या साऱ्या प्रकारात शंकाकुशंका तेव्हापासून चर्चिल्या जात आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Fake Medical Certificate case
MBA-CET Exam : एमबीए-सीईटी परीक्षेच्‍या नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत

कार्यक्षेत्र नसताना गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता तो गुन्हा शहर हद्दीतील आडगाव पोलिसात वर्ग करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ करीत आहेत.

पोलिस महासंचालक कार्यालयाचे निर्देश आल्यानंतर हा गुन्हा शहर हद्दीत वर्ग केला आहे. त्यामुळे त्यावेळी कोणत्या कारणास्तव गुन्हा शहर हद्दीत न दाखल करता, नाशिक तालुका पोलिसात दाखल करण्यात आला, याचीही चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Fake Medical Certificate case
Nashik Political News : मनपाच्या ‘बाकड्या’ वरून लोकप्रतिनिधी ‘वाकड्या’त! पंचवटीतील ‘त्या’ गोष्टींची चर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com