Nashik News : प्रशासकीय अधिकारी की घोटाळेबाज? डॉ. सैंदाणेंच्या बनावट पदविकेचे पितळ उघडे; जिल्हा रुग्णालयाकडून बडतर्फीची शिफारस
Fake Postgraduate Medical Degree Exposed in Nashik Health Department : शासनाची फसवणूक करून कोरोनाकाळात अतिदक्षता विभाग उभारणीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी त्यांना अटक केली असून, न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नाशिक: वैद्यकीय पदव्युत्तर पदविका (डी. आर्थो) बनावट असल्याचे निष्पन्न होऊनही आरोग्य विभागात उच्च पदावर मिरविणाऱ्या डॉ. निखिल सैंदाणे यांना अखेर पोलिस कोठडीचा रस्ता दाखविण्यात आला आहे.