Fake Police
sakal
नाशिक
Nashik Fake Police : नाशिकमध्ये तोतया पोलिसांचा सुळसुळाट! एकाच दिवशी चार ज्येष्ठ नागरिकांना लुटले
Fake Police Gang Creates Panic in Nashik City : नाशिक शहरात पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांच्या दागिन्यांवर डल्ला मारणारी तोतया पोलिसांची टोळी सक्रिय झाली असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नाशिक: शहरात तोतया पोलिसांची टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सोमवारी (ता. १९) तोतया पोलिसांनी शहर परिसरात दोघींस, तर दोघा ज्येष्ठ नागरिकांना गाठून त्यांना पोलिस असल्याची बतावणी केली आणि त्यांचे दागिने हातचलाखीने लंपास करीत त्यांना लुबाडले आहे. या प्रकरणी पंचवटी, उपनगर व नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, तोतया पोलिसांच्या या टोळीच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
