Nashik | तोतया पोलिसाने लाटला लाखांचा ऐवज

fake police
fake police esakal
Updated on

सोग्रस (जि. नाशिक) : चांदवड तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील खडकजांब ते वडाळीभोई शिवारात पेट्रोलपंपासमोरून गाडी बंद पडल्यामुळे दुचाकी ढकलत चालणाऱ्या व्यक्तीला पोलिस असल्याची बतावणी करून त्याच्याजवळील लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. २) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान घडली.

मनमाड येथील सराफ व्यावसायिक कमलाकर हरिभाऊ खरोटे आपले काम आटोपून दुचाकीने पिंपळगावहून मनमाडकडे जात असताना रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली. गाडी बंद पडल्याने ते गाडी ढकलत खडकजांब आणि वडाळीभोई शिवारातील यश पेट्रोलियम पंपापर्यंत आले. त्याच वेळी पल्सर दुचाकीवरून आलेल्या राखाडी पॅन्ट व सफेद रंगाचा शर्ट पेहराव असलेल्या ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीने पोलिस असल्याचे सांगत खरोटे यांना थांबण्यास सांगितले. ते थांबले असता या व्यक्तीने खरोटे यांच्यासमोरील ५० वर्षे व्यक्तीला तुमच्याकडे गांजा आहे, असे सांगून तपासणी केली. त्यानंतर तुमच्याकडे बेकायदा वस्तू नसल्याचे सांगत तोतया पोलिसाने श्री. खरोटे यांच्या बॅगेची तपासणी केली. यादरम्यान त्याने खरोटे यांच्या खिशातून रोकड, गळ्यातील १५ ग्रॅमची अंदाजे ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि बोटातील पंधरा ग्रॅमची सोन्याची अंगठी काढून घेतली.

fake police
दिवाळीत मतदारांना शुभेच्छा देण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा

काही वेळाने श्री. खरोटे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरातील नातलगांना फोन करून त्वरित वडनेरभैरव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

fake police
काही सेकंदातच स्वच्छ करा चांदीची नाणी, या 6 गोष्टींची मदत घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com