नाशिक- रेल्वेमध्ये तिकीट निरीक्षक (टीसी) या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एकाला १४ लाखांना गंडा घालणाऱ्या तिघांविरोधात आडगाव पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी पैसे परत करण्यासाठी दिलेले धनादेश दोनवेळा बाऊन्स झाले आहेत.