Nitin Upasani
sakal
नाशिक: बनावट शालार्थ आयडी प्रकरणी शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी शालार्थ प्रस्तावांवरील सह्या आपल्या नाहीत, आपण त्या केलेल्या नाहीत, असा दावा पोलिस चौकशीत केला आहे. दुसरीकडे एका प्रस्तावावर सहीसाठी तीन ते पाच लाख घेत सुमारे एक हजार बनावट शालार्थ आयडी विकल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे.