Nashik News: फाळके स्मारक पुनर्विकासाचा प्रस्ताव धूळखात; NMCला सल्लागार मिळत नसल्याचा परिणाम

सल्लागार नियुक्त होत नसल्याने शासनाच्या पर्यटन विभागाकडे चाळीस कोटी रुपयांचा प्रस्तावदेखील धूळखात पडून आहे
Dadasaheb Phalke Smarak, Nashik
Dadasaheb Phalke Smarak, Nashikesakal

Nashik News : दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनर्विकास करण्यासाठी सल्लागार संस्था नियुक्त करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आता १८ ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करताना अटी व शर्ती बदलण्यात आल्या आहेत. सल्लागार नियुक्त होत नसल्याने शासनाच्या पर्यटन विभागाकडे चाळीस कोटी रुपयांचा प्रस्तावदेखील धूळखात पडून आहे. (falake memorial redevelopment proposal scrapped Result of NMC not getting consultant Nashik News)

पांडव लेणी येथील २९ एकर जागेत महापालिकेकडून दादासाहेब फाळके स्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. सुरवातीला स्मारकाच्या माध्यमातून महापालिकेला चांगले उत्पन्न मिळत होते, मात्र स्मारकाच्या विविध सेवांचे खासगीकरण करण्यात आल्यानंतर प्रकल्पाला घरघर लागली.

माजी महापौर सतीश कुलकर्णी व स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांच्या कार्यकाळात स्मारकाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. हैदराबाद येथील रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर या प्रकल्पाचा विकास करण्याचे निश्चित करण्यात आले.

त्यासाठी एनडी स्टुडिओला कामदेखील देण्यात आले, मात्र सदरचा व्यवहार महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याचे दिसून आले. वार्षिक १४ लाख रुपये महापालिकेला मिळणार असेल, असे नमूद करण्यात आले होते.

मात्र जवळपास २९ एकर भूखंड त्यावर उभारलेली वास्तूचा संबंधित कंपनीला उपयोग होणार असल्याने त्यात तुलनेत मिळणारी रक्कम कमी असल्याने तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काम रद्द करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर महापालिकेचे तत्कालीन आणि रमेश पवार यांनी प्रकल्पाचा विकास करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dadasaheb Phalke Smarak, Nashik
Nashik: वर्षभरापासून मालेगाव ‘पोषण आहारा’चा प्रश्न सुटेना! खासगी शाळांसह सेंट्रल किचनचे ठेकेदार न्यायालयात

निविदेवर सल्लागारांचे आक्षेप

तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रकल्पाचा पुनर्विकास करण्यासाठी अंदाजपत्रकात घोषणा केली होती, परंतु शासनाच्या पर्यटन व्यवहारातून ४० कोटी रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले.

त्यासाठी बांधकाम विभागाने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट अर्थात प्रकल्प सल्लागार नियुक्त करण्यासाठी निविदा काढून स्वारस्य देकार मागविले. निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने १८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सल्लागार नियुक्त करण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या निविदेवर आठ सल्लागारांनी आक्षेप नोंदविले आहे. यामध्ये टर्नओव्हरची अट कमी करावी, समकक्ष प्रकल्पाच्या अनुभवाच्या अटीत बदल करावा, अशा प्रकारचे आक्षेप नोंदविण्यात आले आहे.

निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर अटी- शर्तीवर प्रीबीड बैठकीत आक्षेप नोंदविण्यात आल्याची माहिती शहर अभियंता नितीन वंजारी यांनी दिली. त्यामुळे अटी व शर्ती बदल करीत १८ ऑगस्ट ही नवीन तारीख देण्यात आली आहे.

Dadasaheb Phalke Smarak, Nashik
Nashik News: शहरात लवकरच सिग्नलवर ई-चलन यंत्रणा! 800 CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतुकीवर नियंत्रण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com