नाशिक- कॉलेज रोड येथे कौटुंबिक कलहातून पिता- पुत्रांमध्ये जोरदार भांडण झाले व त्याचे पर्यावसन फ्रीस्टाइल हाणामारीत झाले. त्यामुळे विठ्ठल मंदिराजवळील चौकात अर्ध्या तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. भांडण बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतुकीचा पुरता खेळखंडोबा झाला. मात्र संबंधित भांडण सोडविण्यासाठी एकही नागरिक पुढे आला नाही.