बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातल्या माजलगाव धरणालगत वसलेले केसापूरी गाव आहे. येथील सुभाष व गजानन या दोन भावांमध्ये वडिलोपार्जित जमिनीवरून वाद होता. जुलै २००१ मध्ये लहान भाऊ गजानन हा त्याच्या पत्नी आणि गड्यासह शेतामध्ये पिकाला पाणी भरण्याचे काम करीत होता. त्याचवेळी त्याचा मोठा भाऊ सुभाष, त्याची तीन मुले, पत्नी आणि दोन सुना हे शेतात आले आणि त्यांनी पुन्हा गजानन याच्याशी शेत जमिनीच्या वादातून भांडण सुरू केले. भांडण विकोपाला गेल्याने सुभाषच्या मोठ्या मुलाने त्याच्याकडील कुऱ्हाडीने त्याचा चुलता गजानन यांच्या डोक्यात घाव घातला.