sterilisation
sterilisationesakal

Family Planning Surgery : पुरुष नसबंदीत पेठ, सुरगाणा आघाडीवर! जिल्ह्यात इतर तालुक्यात पुरुषांची उदासीनता

नाशिक : असेही कोणतेही क्षेत्र नाही जिथे, महिलांची आघाडी नाही. अगदी कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेतही नाशिक जिल्हयात महिलांनी आघाडी घेतली असून, पुरुषांनी मात्र याकडे सपशेल पाठ फिरविली आहे.

यातून पुरुषी मानसिकतेची उदासीनताच अधोरेखित होते. असे असले, तरी जिल्ह्यातील आदिवासी तालुके म्हणून गणल्या जात असलेल्या पेठ व सुरगाणा या तालुक्‍यांत महिलांच्या बरोबरीने पुरुषांनीही नसबंदी केल्याची बाब विशेष उल्लेखनीय आहे. (Family Planning Surgery Peth Surgana in lead in sterlisation Depression of males in other taluka in district nashik news)

एक किंवा दोन अपत्यांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्या जात असून याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंत जिल्हयात १४ हजार ६४४ कुटुंब नियोजन शस्रक्रिया झाल्या आहेत. मात्र त्यात महिलांची संख्या १३ हजार ९७१ तर पुरुषांची अवघी ६७३ आहेत.

अशी आघाडी, अशी पिछाडी

पेठ, सुरगाणा, व त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल भागातच शस्त्रक्रियेत पुरुषांची मात्र आघाडी आहे. त्र्यंबकेश्वरला १२८, सुरगाण्यात ३२४ तर, पेठमध्ये १९६ पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतल्या आहेत. नाशिकला अवघ्या पाच जणांनी, इगतपुरीत दोघांनी, निफाडला सहा तर, कळवणाल केवळ एका पुरूषांनी शस्त्रक्रिया करून घेतली आहे.

नसबंदी करण्यास पुरुषी मानसिकतेत उदासीनताच दिसून येत असली तरी, कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचा भार महिलांनी उचलला असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे. पुरुषांत नसबंदीचे प्रमाण वाढविण्यासाठीचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आतापर्यंत ५४ टक्के काम झाले आहे. शस्त्रक्रिया उद्दिष्टपूर्तीसाठी आरोग्य विभागाकडे तीन महिने शिल्लक आहेत.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

sterilisation
Nashik News: चोरीला गेलेला रस्ता पंधराव्या वित्त आयोगातील शिवरस्ता? रस्त्यावरून तक्रारदार अन ZPमध्ये जुंपली!

आदिवासी भागात प्रतिसाद

जिल्हा आरोग्य विभागासमोर पुरुष नसबंदीसाठी यंदा दोन हजार २४४ पुरुष नसबंदीचे उद्दिष्ट असताना, यापैकी केवळ ६७३ पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया झाली. यात आदिवासी भागातील सुरगाणा तालुक्‍यातील ३२४ पुरुषांनी नसबंदी करीत जिल्ह्यात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ पेठ (१९६), त्र्यंबकेश्‍वर (१२८) तालुके आहेत. बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर ही तालुके पिछाडीवर आहे.

१३ हजारावर शस्त्रक्रिया

जिल्ह्यात २६ हजार ९६६ कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट असताना ५४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. यात निफाड तालुका १ हजार ६५२ आघाडीवर तर सुरगाणा तालुका ५४७ नीचांकी आहे. १३ हजार ९७१ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

तालुकानिहाय झालेल्या शस्त्रक्रिया बागलाण (१५७२), चांदवड (८१६), देवळा (७१४), दिंडोरी (९०९), इगतपुरी (९०२), कळवण (८६८), मालेगाव (१४७४), नांदगाव (६६१), नाशिक (१५८३), निफाड (१६४६), पेठ (४६६), सिन्नर (७८६), सुरगाणा (२३३), त्र्यंबकेश्वर (६७७).

sterilisation
Subhash Desai | दाओसमधील करार ही निव्वळ धूळफेक : सुभाष देसाई

पुरुष नसबंदी (तालुकानिहाय)

बागलाण (०), चांदवड (१), देवळा (२), दिंडोरी (८), इगतपुरी (२), कळवण (१), मालेगाव (०), नांदगाव (०), नाशिक (५), निफाड (६), पेठ (१९६), सिन्नर (०), सुरगाणा (३२४), त्र्यंबकेश्‍वर (१२८), येवला (०).

"आरोग्य विभागातर्फे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी सातत्याने जनजागृतीवर उपक्रम राबविले जातात. महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण नसबंदीमध्ये कमी आहे. जिल्ह्याला दिलेले अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विभागाचे प्रयत्न राहणार आहे."

- डॉ. हर्षल नेहते, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.

sterilisation
Nashik Crime News: परप्रांतीय गुन्हेगारांसाठी सातपूर- अंबड ठरतंय आश्रयस्थान! पोलिसांकडून Moniteringची आवश्‍यकता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com