Nashik News : वडिलांच्या स्मरणार्थ एक गुंठा जमीन दान; शेतकरी अण्णासाहेब गितेंचा स्तुत्य उपक्रम

Land donation
Land donation esakal

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : अक्षय तृतीया हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी अनेक नागरिक नवीन वस्तू खरेदी करतात. (Farmer Annasaheb Gite donated one guntha of land in memory of his father to make jalkumbh nashik news)

या सणाच्या दिवशी सिन्नर तालुक्यातील मेंढी गावातील शेतकरी अण्णासाहेब खंडेराव गिते या ग्रामस्थाने आपल्या पित्याच्या स्मरणार्थ दत्तनगर ओवंडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत व सर्वांना पाणी मिळावे या हेतूने जलकुंभ बनवण्यासाठी एक गुंठा जमीन वडिलांच्या स्मरणार्थ दान केली.

यावेळी ग्रामस्थांनी अण्णासाहेब गिते यांचे आभार मानले. तसेच त्यांच्या सर्व कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. गिते परिवारांनी दत्तनगर येथील ग्रामस्थांसाठी अतिशय समाजभिमुख निर्णय घेतल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अण्णासाहेब गिते यांच्या कुटुंबियांच्या हस्ते जलकुंभ जागेसाठी भूमिपूजन करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Land donation
Jalyukt Shivar Yojana : जलयुक्त शिवारच्या 210 गावांमध्ये उद्यापासून शिवारफेरी; वेळापत्रक जाहीर

यावेळी मेंढी येथील ग्रामस्थ बहुसंख्य उपस्थित होते. याप्रसंगी मेंढी गावचे ग्रामस्थ व सरपंच जयश्री अनिल गिते,अनिल गिते, जिजाबाई खंडेराव गिते, चारुशीला ताई गिते, सुभाष काळू गिते, बाळू नाना गिते, मोहन गिते, विकास गिते, सिताराम गिते, अनिल गिते, देविदास गिते आदी उपस्थित होते.

अण्णासाहेब गिते हे शेतकरी कुटुंबातील आहे. आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी पाणी हा अतिशय सर्वांचा जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळला. यासाठी वडिलांच्या स्मरणार्थ एक गुंठा जमीन देऊन त्या जागेवर एक जलकुंभ होणार असल्याने अनेकांचे पाणी प्रश्न मिटणार आहे. अतिशय योग्यआण्णासाहेब गीते या कुटुंबीयांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मेंढी हे गाव शेतीप्रधान असल्याने येथे अनेकांची उपजीविका ही शेतीच असल्याने तरुण वर्ग हे नाविन्यपूर्ण शेतीमध्ये प्रयोग करीत असतात.

Land donation
Nashik News : शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी जात असलेल्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com