Onion Crop Crisis : येवल्यात कांदयाला अग्नीडाग देत केली होळी साजरी!

farmer celebrate Holi by setting fire to one and half acre onion crop due Constant fall in onion prices nashik news
farmer celebrate Holi by setting fire to one and half acre onion crop due Constant fall in onion prices nashik newsesakal

येवला (जि. नाशिक) : कांद्याच्या (Onion) दरात सातत्याने घसरण होत असून हे पीक घेण्यासाठी गुंतवलेले भांडवलही मिळेनासे झाले आहे. यामुळे वैतागलेल्या मातुलठाण येथील शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलत दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी केली आहे. (farmer celebrate Holi by setting fire to one and half acre onion crop due Constant fall in onion prices nashik news)

गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दराचा गोंधळ वाढला असून यावर्षीच्या हंगामात तर मातीमोल दराने कांदा विक्रीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. घसरलेल्या दरामुळे नाशिक जिल्ह्यात ठीकठिकाणी आंदोलने होत असून शेतकऱ्यांचा उद्रेक सुरू आहे. रविवारी तर केंद्रीय मंत्री भारती पवार यांना शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नी घेराव घालत जाब विचारला होता.

गेल्या दोन महिन्या पासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.कांदा भाव घसरणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होळीचे औचित्य साधून मातुलठाण येथील तरुण शेतकरी कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याने त्याच्या शेतातील दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन आगळेवेगळे आंदोलन केले.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

येवला येथे दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी
येवला येथे दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी esakal
farmer celebrate Holi by setting fire to one and half acre onion crop due Constant fall in onion prices nashik news
Export Grapes : नामांकित कंपनीच्या औषधामुळे एक्स्पोर्ट द्राक्ष पिक मातीमोल!
येवला येथे दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी
येवला येथे दीड एकर कांदा पिकाला अग्निडाग देऊन होळी साजरी esakal

कांद्याच्या भावात घसरण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली मात्र तरी देखील भावात सुधारणा झाली नाही.त्यामुळे डोंगरे यांनी टोकाचे पाऊल उचलत शेतात ठिकठिकाणी सरण रचून कांदा पेटवून देत संताप व्यक्त केला.

शासनाने आता तरी दखल घेऊन कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव जाहीर करावा तसेच यावर्षीच्या हंगामात विक्री केलेल्या कांद्याला हजार रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे अशी मागणी डोंगरे यांनी केली आहे.

farmer celebrate Holi by setting fire to one and half acre onion crop due Constant fall in onion prices nashik news
Nashik Rain : इगतपुरीत मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह मुसळधार गारांच्या अवकाळीचे तांडव!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com