Tue, Sept 26, 2023

Nashik News : औषधामुळे फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यु
Published on : 3 June 2023, 10:05 am
Nashik News : पाथर्डी फाटा परिसरातील शेतात औषध फवारणी करताना ४६ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्युची घटना घडली. ज्ञानेश्वर भिवा बोराडे (४६, रा. पाथर्डी फाटा) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. गेल्या शुक्रवारी (ता. २) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ते औषध फवारणी करीत होते. (Farmer dies while spraying due to medicine Nashik News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यावेळी विषारी औषध तोंडावाटे गेल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना भाऊ तानाजी बोराडे यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा सायंकाळी मृत्यु झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.