येवला- कृषी विभागाने विविध शासकीय योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केला आहे. आता फळपीक योजनेसाठी देखील ‘फार्मर आयडी’ बंधनकारक असणार आहे, तरच पिक विम्यात शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. दरम्यान, विमा योजनेत सहभागासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.