Climate Change : ढगाळ वातावरणाने पुन्हा धास्तावला बळीराजा! बदलत्या वातावरणामुळे वाढल्या आरोग्याच्या समस्या

Cloudy weather on Monday in various parts of the taluk.
Cloudy weather on Monday in various parts of the taluk.esakal

इगतपुरी (जि. नाशिक) : हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी (ता. १३) सकाळपासूनच तालुक्यात पुन्हा ढगांनी आकाश व्यापून टाकल्यामुळे व गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा सारखा खालीवर सरकता राहिला आहे.

हवेतला गारवा गायब झाला असून उन्हाची तीव्रता वाढली आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे तालुक्याच्या अनेक भागात उष्णता वाढली आहे. तसेच, या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

सध्या अनेक गावांमध्ये सर्दी, खोकल्याबरोबरच दमा तसेच हात-पाय दुखणे अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. (farmers again scared by cloudy environment Increased health problems due to changing climate nashik news)

तालुक्यात आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याची धावपळ होत होती. आता अचानक ढग आल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत.यामुळे भाजीपाला व इतर पिकांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नुकसानीच्या भीतीने बळीराजा अधिक प्रमाणात धास्तावला आहे.

आरोग्याच्या समस्या वाढल्या

इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. दुपारी कडक ऊन तर सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवत असल्याने आजार बळावत आहेत.

विशेषत: रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांना या वातावरणाचा त्रास जाणवत आहे. दररोज रुग्णालयांमध्ये ओपीडीमध्ये रुग्ण सर्दी, खोकला आणि इतर आजारांचे रुग्ण वाढल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Cloudy weather on Monday in various parts of the taluk.
Nashik News : नांदगावजवळ धावत्या रेल्वेत महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म!

सकाळी धुके, दुपारी उन्हाचा कडाका

वातावरणात अधूनमधून उद्भवणाऱ्या अस्मानी संकटामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. इगतपुरी तालुक्यासह इगतपुरी शहर व परिसरात गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरण, मध्येच झालेला अवकाळी पाऊस व बदललेल्या हवामानामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ढगाळ व दमट हवामानामुळे आरोग्याच्या कुरबूरीमध्ये वाढ झाली आहे. या स्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांनी रोग प्रतिकारक क्षमता वाढविणारी जीवनशैली जपावी असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे. सकाळी धुके-गारवा तर दुपारी उन्हाचा कडाका बसत आहे.

वातावरणातील असमतोलामुळे दुखणे

आरोग्याच्या समस्यांमध्ये ताप, सर्दी, अंगदुखी, दमा, डोकेदुखी, अपचन, यासारख्या समस्यांनी हैराण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ढगाळ व दमट वातावरणामुळे व्हायरल आजारांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

तसेच, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणाऱ्या रुग्णांसोबतच दमा व संधीवात सारख्या आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांनी दक्षता घ्यावी असा सल्लाही आर्युवेदतज्ज्ञ डॉ. स्वाती गाडे यांनी दिला आहे.

Cloudy weather on Monday in various parts of the taluk.
Nashik News : नांदगाव तालुका विकासकामांसाठी 212 कोटीचा निधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com