Nashik Onion Price Fall: कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची विक्रीसाठी धावपळ; मुंगसेमध्ये 19 हजार क्विंटल आवक

Nashik Onion Price Fall: कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची विक्रीसाठी धावपळ; मुंगसेमध्ये 19 हजार क्विंटल आवक
esakal

Nashik Onion Price Fall: केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी लागू केल्यापासून भाव एक ते दीड हजार रुपयांनी घसरले आहेत. भाव आणखी घसरण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी आहे तो कांदा बाजारात विक्रीसाठी आणण्याची लगबग सुरू केली आहे. राखून ठेवलेला उन्हाळ कांदा संपत आला असून लाल कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे.

आठवड्यापासून कमी होत असलेला भाव पाहून काही शेतकरी कमी दिवसाचा कांदा विक्रीसाठी आणत आहेत. मालेगाव बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात शुक्रवारी (ता. १५) २० हजार क्विटंल कांद्याची आवक होती. त्यात १९ हजार क्विटंल लाल कांदा होता. (farmers are busy bringing onion for sale in market nashik news)

कांद्याला गेल्या तीन महिन्यापासून चांगला भाव मिळत होता. दिवाळीनंतर कांदा चार हजारांवर गेला होता. चांगला भाव मिळत असल्याचे पाहून शेतकऱ्यांनी लेट खरीप कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.

काही ठिकाणी लेट खरीप कांदा काढून लगेच विक्रीसाठी आणला जात आहे. सरकारने ८ डिसेंबरला कांदा निर्यातबंदी जाहीर केली. दुसऱ्या दिवसापासून भावात घसरण सुरू झाली. मुंगसे बाजारात ७ डिसेंबरला लाल कांद्याला क्विटंलला किमान १ हजार, तर कमाल ४ हजार १००, सरासरी भाव ३ हजार ५० रुपये होता.

शेतकरी संघटना आणि कांदा उत्पादकांनी निर्यातबंदीला विरोध केला. मात्र, अद्याप कुठलाही तोडगा निघाला नाही. सोमवारपासून (ता. ११) बाजारभाव हजार रुपयांनी घटले. सोमवारी लाल कांद्याला क्विटंलला किमान ७५०, कमाल २ हजार ८००, तर सरासरी १ हजार ८०५ रुपये भाव होता. सरासरीच्या तुलनेने भावात हजार ते बाराशे रुपयांनी घट झाली. सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांपैकी मंगळवारी (ता. १२) अमावस्यानिमित्त बाजार बंद होता.

Nashik Onion Price Fall: कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची विक्रीसाठी धावपळ; मुंगसेमध्ये 19 हजार क्विंटल आवक
Nashik Onion Purchase: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’ची खरेदी देखावाच! केंद्राची जाहिरात, मात्र दोनच केंद्रे सुरू

उर्वरित चार दिवसांत सोमवारी १२ हजार, बुधवारी १५ हजार, गुरुवारी १७ हजार, तर शुक्रवारी (ता. १५) २० हजार क्विटंलहून अधिक आवक होता. भाव आणखी कमी होण्याच्या शक्यतेने बाजारातील आवक वाढली आहे. शुक्रवारी क्विटंलला किमान ८००, कमाल २ हजार २२१ आणि सरासरी १ हजार ९५० रुपये भाव होता. आठवड्याच्या तुलनेने भावात मोठी घट झाल्याने शेतकऱ्यांनी आहे.

उन्हाळ कांद्याच्या भावाचा प्रश्‍न

मालेगाव तालुक्यासह कसमादेतील शेतकऱ्यांनी खरीप व लेट खरिपात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. सध्या ९० टक्के लाल कांदा बाजारात येत आहे. उन्हाळी कांदा संपत आला आहे. लाल कांदा उन्हाळ कांद्यासारखा राखून ठेवता येत नाही. अधिक दिवस ठेवल्यास कांद्याला कोंब फुटतात. कांदा खराब होण्याची दाट शक्यता असते.

परिणामी, काढणीनंतर लागलीच कांदा बाजारात आणला जात आहे. आवक वाढल्याने भावातील घसरण सुरू आहे. दरम्यान, उपलब्ध पाणी व धरणांमधील आवर्तनाच्या भरवशावर उन्हाळ कांदा लागवडीची धूम सुरू आहे. कर्नाटक, राजस्थान मधील कांदा बाजारात येत आहे. अशा परिस्थितीत निर्यातबंदी कायम राहिल्यास उन्हाळ कांद्याला जेमतेम भाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Nashik Onion Price Fall: कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची विक्रीसाठी धावपळ; मुंगसेमध्ये 19 हजार क्विंटल आवक
Nashik Onion Price Fall: कांद्याच्या दरात घसरण सुरूच; कांदा उत्पादक शेतकरी हतबल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com