
ढगाळ वातावरणामुळे धास्तावला बळीराजा; ऐन हंगामातील रब्बीवर संक्रांत
इगतपुरी (जि. नाशिक) : निसर्गाचा समतोल राखून ऋतुमानानुसार योग्य वातावरण असले तर शेतकऱ्यांना निसर्ग दोन्ही हातांनी भरभरून देतो मात्र जर निसर्गच कोपला अन् आस्मानी संकट आले तर शेतकऱ्यांसह मनुष्य पूर्णतः उध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. असेच काही निसर्गाच्या वातावरण बदलामुळे घडत असल्याचा प्रत्यय सध्या अनुभवायला येत आहे. सकाळी गारवा, दुपारी ढगाळ वातावरण आणि तप्त उन्हामुळे दमट हवामान आणि संध्याकाळी पावसाचे वातावरण या बदलत्या वातावरणामुळे बळीराजा कमालीचा धास्तावला आहे.
तालुक्यात आज हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्याची धावपळ होत होती त्यातच मागील अवकाळी पाऊसामुळे भात शेतीचे नुकसान झाले होते काही भागात भात पिकातून पाणी न ओसरल्याने जमेल तशी पिकांची लागवड करुन तग धरली होती मात्र त्यावर आता अचानक ढग आल्याने चितेंचे ढग गडद झाले आहेत .यामुळे भाजीपाला व इतर पिकांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे नुकसानीच्या भितीने बळीराजा आधिक प्रमाणात धास्तावला आहे
हेही वाचा: नाशिक महापालिका निवडणुक : मनपा निवडणुकांवरून इच्छुकांमध्ये घालमेल
ढगाळ वातावरण,पाऊसाचा शिडकावा आणि सततच्या वातावरणीय बदलामुळे शेतातील कांदा,टोमॅटो,वांगी,गहू, हरभरा सारख्या रब्बी पिकांवर संक्रांत आल्यासारखे वाटते. तर अशा वातावरणामुळे करपा,मावा,तुडतुडे,आदी किडींसह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.याचा परिणाम पिकांच्या प्रतवारीत होणार असून उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हेही वाचा: Video: नाशिकला अवकाळी पावसाचा तडाखा
"ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर करपा,मावा,भुरी यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.त्यामुळे फवारणीसाठी औषधे,खते यासारख्या उत्पादन खर्चात वाढ होते तसेच पीकामध्येही घट येण्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडत असतो."
- सखाराम गुळवे,कांदा उत्पादक शेतकरी, बेलगाव कुऱ्हे (ता इगतपुरी )
हेही वाचा: नाशिक : अवकाळीचा दणका; वळवाडेत वीज पडून बैल मृत्युमुखी
Web Title: Farmers Are Worried As Fungal Diseases Including Insects Are Affecting The Crops Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..