crop loss
sakal
नाशिक: जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात ई-केवायसी व शासनाच्या संकेतस्थळावर याद्या अपलोड करण्यासाठी होणाऱ्या विलंबाचा फटका बाधित शेतकऱ्यांना बसत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १९२ कोटी ४१ लाख ५८ हजार १७४ रुपयांचे अनुदान जमा झाले. तसेच, अद्यापही सुमारे ३६ टक्के बाधित शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत.