शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा फार्मर आयडीच्या आधारे थेट मदत देण्याची कृषिमंत्र्यां दत्ता भरणे यांच्याकडे आमदार बनकर यांची मागणी

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा  फार्मर आयडीच्या आधारे थेट मदत देण्याची कृषिमंत्र्यां दत्ता भरणे यांच्याकडे आमदार बनकर यांची मागणी
Published on: 
पान तीन -------------- १०२४५ मुंबई : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा या मागणीचे निवेदन कृषीमंत्री दत्ता भरणे यांना निवेदनाव्दारे करतांना आमदार दिलीप बनकर. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा आमदार दिलीप बनकर यांची कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे मागणी सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. १४ : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवताना ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा मोलाचा वेळ वाया जात असून, नुकसानभरपाई मिळण्यास मोठा विलंब होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करावी आणि शेतकऱ्यांच्या ''फार्मर आयडी''च्या आधारे थेट आर्थिक मदत त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे आमदार दिलीप बनकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. अवेळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, सततचा पाऊस तसेच दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. अशा संकटाच्या काळात शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. मात्र, प्रत्यक्ष मदत मिळण्याच्या प्रक्रियेत पंचनामे, अहवाल सादर करणे, शासन निर्णयानुसार मदत मंजूर होणे, पोर्टलवर माहिती अपलोड करणे आणि त्यानंतर ई-केवायसी पूर्ण करणे अशा अनेक क्लिष्ट टप्प्यांतून शेतकऱ्यांना जावे लागते. ----------- तांत्रिक त्रुटींमुळे शेतकरी हैराण पोर्टलमधील तांत्रिक अडचणी आणि आधार प्रमाणीकरणातील त्रुटींमुळे शेतकऱ्यांना महावितरण, बँक आणि सेवा केंद्रांचे वारंवार हेलपाटे मारावे लागतात. परिणामी, नैसर्गिक आपत्तीने आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीसाठीही अतिरिक्त मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्याची मागणी शासनाने शेतकऱ्यांसाठी आधीच ''फार्मर आयडी''ची व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे त्याच आधारे शेतकऱ्यांची ओळख व संबंधित माहितीची पडताळणी करून नुकसानभरपाईची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करावी. पुन्हा ई-केवायसीची अट घालून मदत वितरणाची प्रक्रिया गुंतागुंतीची करण्याऐवजी ती अत्यंत सुलभ आणि गतिमान करावी, अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com