शेतकऱ्याने पिकवली 130 किलो अफूची शेती; अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

 opium farming
opium farmingesakal

सिन्नर (जि. नाशिक) : लागवड आणि उत्पादन घेण्यास महाराष्ट्र राज्यात कायद्याने बंदी असलेल्या अफु या पिकाची एक गुंठे क्षेत्रात लागवड केल्याची बाब सिन्नर तालुक्यातील वावी जवळच्या फुलेनगर मध्ये उघडकीस आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वावी पोलिसांनी सदर शेती उध्वस्त करीत 130 किलो वजनाचा ओला व सुका मुद्देमाल जप्त केला असून त्याची किंमत अंदाजे 2 लाख 60 हजार रुपये इतकी आहे.

कोणाला कळू नये म्हणून बाजूला केली मक्याची लागवड

वावी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलेनगर गावातील शेती गट नंबर 405 मध्ये विलास कृष्णाजी अत्रे (62) या शेतकऱ्याने अफु या पिकाची लागवड केल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांना मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करून घेत श्री. कोते यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे, निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांना सुचित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार गुरुवारी (ता.18) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास फौजफाटा घेऊन श्री. कोते यांनी अत्रे यांच्या शेतातील अफूचे पीक उध्वस्त केले.

 opium farming
जादा रकमेचा फायदा पडला महागात; दाम्पत्याने 35 लाखाला घातला गंडा

निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा, सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मंडळ कृषी अधिकारी अशोक बागूल यांचे समवेत महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी देखील या कारवाईत सहभागी झाले होते. वावी- नांदुरशिंगोटे रस्त्यापासून अर्धा किमी आतमध्ये सदरची शेती पिकवण्यात आली होती. सुमारे एक गुंठे क्षेत्रात उभ्या पट्टीत लागवड केलेले अफूचे पीक काढणी योग्य झाले होते. दोन ते अडीच फूट उंच वाढ झालेल्या अफूची बोंडे पिकलेल्या अवस्थेत होती. सदरचे पिक सहजगत्या कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून रस्ता असलेल्या तीन बाजूने मक्याची लागवड करण्यात आली होती. तर एका बाजूला कांदा लावण्यात आला होता. कांदा पिका देखील पाणी भरण्याच्या दंडालगत अफूची झाडे लावल्याचे पोलिसांना आढळून आले.

 opium farming
नाशिक : शहर-ग्रामीण लढाईत बाजी कोणाची?

या कारवाईत सहभागी राजपत्रित अधिकाऱ्यांसह वावीचे तलाठी कैलास गायकवाड, पांगरीचे तलाठी सोपान गुळवे या पंचांसमक्ष संपूर्ण कारवाईचा पंचनामा करण्यात आला. लागवड केलेली अफूची सर्व झाडे उपटून त्यांचे वजन केले असता 130 किलो भरले. त्याची बाजार मूल्यानुसार अंदाजीत किंमत दोन लाख साठ हजार रुपये इतकी आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवळी, सहाय्यक उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, हवालदार योगेश शिंदे, पोलिस शिपाई नितीन जगताप, सोपान शिंदे, संदीप जाधव, भास्कर जाधव, गोविंद सूर्यवाड, प्रकाश चव्हाण, प्रकाश उंबरकर या कारवाईत सहभागी झाले होते. पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवळी यांच्या फिर्यादीवरून शेतकरी विलास अत्रे यांच्या विरोधात अमली औषधी द्रव्य व मनो: प्रभावी पदार्थ विधि निषिद्ध व्यापार प्रतिबंध अधिनियम 1988 अन्वये वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com