नाशिक- शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार नसली, तरी किमान व्याज माफ करावे. कोणी किती कर्ज घेतले हे न पाहता बँकेने सरसकट व्याज माफ करून मुद्दल रकमेचे दहा हप्त्यांमध्ये विभाजन करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी सहकारी बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्याकडे शुक्रवारी (ता. ११) केली.