खरिपासाठी सौभाग्याचं लेणं गहाण! शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेना

बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले नसल्याने शेतकरी लागवडीसाठी अडून राहिला आहे.
Farmers crisis
Farmers crisisesakal

अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला सुरवात झाली असली तरी बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले नसल्याने शेतकरी लागवडीसाठी अडून राहिला आहे. जिल्हा सहकारी बँकेकडे पीककर्जासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र हंगामास उशीर होवू नये म्हणून शेतकऱ्यांवर कारभारणीचं सौभाग्याच लेण गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. (Latest marathi news)

राष्ट्रीयकृत बँकांकडून रब्बीसाठी घेतलेले पीककर्ज उन्हाळ कांद्याच्या लागवडीसाठी खर्च झाले आहे. खरिपासाठी उन्हाळ कांद्याचा एकमेव आधार होता मात्र अत्यल्प भावामुळे कांदा चाळीत पडून आहे. आतापर्यंत हाती असलेली रक्कम बियाणे, खते यासाठी खर्च झाली आहे. आता जवळ दमडी शिल्लक नसल्यामुळे शेतकऱ्याची बँकेत पत घसरली असल्याचे बँक सांगत आहे. त्यामुळेच आपल्या सौभाग्याचे लेण असलेल मंगळसूत्र सौभाग्यवती शेतकरणीला बँकेत गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

Farmers crisis
PHOTOS: पणजोबा ते पणतू; शिंदे घराण्यातल्या चार पिढ्या विठोबा चरणी!

भात लागवडीचा खर्च दुप्पट

मागील आठवड्यापासून इगतपुरी तालुक्यात पुरेसा पाऊस पडतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची खरीपासाठी लगबग सुरु आहे. तूर, सोयाबीन, नागली, वरई यासारख्या पिकांची पंचेचाळीस टक्क्यांनी लागवड झाली आहे. मात्र प्रमुख पीक असलेल्या भाताची लागवड थोड्याफार प्रमाणात सुरु झाली आहे. शेतकऱ्यांना बॅंकेने पीककर्ज उपलब्ध करुन दिलेले नाही. एकरी पंचवीस हजार रुपये भात लावणीचा खर्च आहे. मजुरी शंभर रुपयांनी वाढली असून गाळासाठी ट्रॅक्टरचा खर्च एका एकरासाठी हजार रुपयांनी वाढला असल्याने लागवडखर्च तब्बल दुपटीने वाढला असल्याने भातशेती परवडण्या योग्य राहिली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Farmers crisis
Ashadhi Ekadashi 2022 विठू माऊली तू माऊली जगाची...

''यंदाच्या रब्बी हंगामात अवकाळी पावसाच्या ढगाळ हवामानामुळे बागायती पिके दर्जेदार झालेली नाहीत. चार पाच तोडयांमध्येच टोमॅटो पीक संपले. शेतकऱ्यांना खरिपासाठी एकमेव कांद्याची आशा होती, मात्र भाव नसल्याने कांदा चाळीतच पडून आहे. बँकेत वारंवार चकरा मारुनही पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सौभाग्याच लेण गहाण ठेवल्याशिवाय पर्याय नाही.'' - भाऊसाहेब दिवटे, शेतकरी.

Farmers crisis
राष्ट्रीय व्यथेची हळहळ : एक काळ ऐसा होता!

''खरीपासाठी पीककर्ज मिळणे गरजेचे असतांनाही बँका शेतकऱ्यांना ते उपलब्ध करून देत नाही. तालुक्यातील आमदारांसह अन्य लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. बँकाच्या आडमुठेपणाचा जाब विचारुन बळीराजाला तात्काळ पीककर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे.'' - नारायण जाधव, अध्यक्ष शेतकरी संघटना, इगतपुरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com