CORONA तिसर्‍या लाटेचा शेतकर्‍यांना धसका

Farmer
Farmeresakal

विंचूर (जि. नाशिक) : कोरोनाच्या (Corona) पहिल्या व दुसऱ्या लाटेने आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असल्याने आता परत शासनाने पुढील दोन महिन्यात तिसरी लाट येईल आणि लॉकडाऊन होऊ शकतो असे संकेत वर्तविल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी द्राक्ष व कांदा पिके काढणीला आलेली असतानाच काढणीच्या हंगामात कोरोनामुळे शासनाने देशात अचानक लॉकडाउन (Lockdown) केला. त्यामुळे शेतकऱ्यांना द्राक्षांचे नाइलाजास्तव घरीच मणुके तयार करून कमी भावाने विकावे लागले. कांद्याची निर्यात खुली झाली आणि दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन झाल्याने कांदाही खूपच कमी दराने विकला गेला. याचा परिणाम संपूर्ण शेतकरी वर्गावर झाला. याचीच पुनरावृत्ती सलग दुसऱ्यावर्षी आलेल्या कोरोनाच्या लाटेने झाली. कोरोनाचे सावट सांगून शेतीमालाला भाव मिळत नसल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

Farmer
छंदच बनला रोजगाराचे साधन! कौतुकाची थापच ठरली प्रेरणा

कोरोना सह वादळी अन् अवकाळी पावसाचाही शेकऱ्यांना फटका

शेतकरी वर्ग अजूनही सावरलेला नसताना यंदाही पीक ऐन काढणी वेळेसच तिसरी लाट येणार असल्याचे वर्तवण्यात येत आहे. पुन्हा लॉकडाऊन होण्याचे संकेत देण्यात येत आहे. सध्याच शेतमालाला भाव मिळत नाही, मागील दोन वर्षाचीच पुनरावृत्ती पुन्हा होते की काय या भीतीने शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे. दरवर्षी वादळी व अवकाळी पावसासारख्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना त्यात भर म्हणून यंदाही तिसऱ्यावर्षी कोरोनाचे रुग्ण वाढून लॉकडाऊनची शक्यता सरकारकडून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या नशिबी येणारे प्रत्येक वर्षे दुष्काळात तेरावा महिना घेऊन येते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. त्यातून आता कसे पडावे अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.

''कोरोनामुळे मागील दोन वर्षात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यातून अजून शेतकरी सावरलेले नाही. दोन-तीन महिन्यात तिसरी लाट येणार असे सांगितले जात आहे. असे किती दिवस चालणार, हे असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी.'' - संदीप गारे, शेतकरी, खानगाव.

Farmer
ग्रामीण भागात हक्काच्या घरासाठी नागरीकांना प्रोत्साहित करा : गमे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com