छंदच बनला रोजगाराचे साधन! कौतुकाची थापच ठरली प्रेरणा

rekha shukla from Nashik started her own career as a sculptor
rekha shukla from Nashik started her own career as a sculptor Sakal

कळवण (नाशिक) : जर एखाद्याला कलेचा छंद असेल आणि तो छंद त्याने सातत्याने जोपासत राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तर हा छंदच रोजगाराची निर्मिती करणारा ठरतो. हे नाशिक शहरातील रेखा शुक्ल यांनी दाखवून दिले आहे.


नाशिक येथील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या रेखा शुक्ल यांना शालेय वयापासूनच चित्रकलेची आवड होती. मुलगी प्रीतीच्या शाळेमध्ये लहानपणी गणपती तयार करून मागितला. रेखा शुक्ल यांनी प्रीतीला गणपती तयार करून दिला. घरी तयार केलेला गणपतीच्या मूर्तीचे सादरीकरण शाळेत केल्यावर शाळेतील कार्यानुभवाच्या शिक्षकांना तो गणपती आवडला व प्रीतीला या मूर्ती तयार करण्याच्या कामात कुणी मदत केली याबद्दल विचारले. तिने आपल्या आईच्या मदतीने ही मूर्ती साकारल्याचे सांगितल्यावर रेखा शुक्ल यांना शाळेत बोलविण्यात आले. रेखा शुक्ल यांना मूर्ती बनविण्याची आवड असल्यामुळे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मातीपासून गणपती कसा बनवावा, याबाबत मार्गदर्शन केले. एकदा शिकविणे म्हणजे दोनदा शिकणे, असे नेहमी म्हटले जाते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर रेखा शुक्ल यांना आपल्या कलेबाबत अजून आवड निर्माण झाली. शाळेत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केल्यामुळे शाळेने रेखा शुक्ल यांचे विशेष कौतुक केले. शाळेतील कौतुकाची थापच रेखा शुक्ल यांना मूर्तिकार बनवून गेली अन् तेथूनच त्यांच्या रोजगाराचा श्रीगणेशा झाला.

rekha shukla from Nashik started her own career as a sculptor
नाशिक : विधानसभा सदस्य असल्याचे भासवणारा तोतया लोकसेवक गजाआड

शेजारच्या मैत्रिणीचे सहकार्य मिळू लागले. दुसऱ्या वर्षी त्यांनी ५० मूर्त्या तयार केल्या. बाजारात चांगल्या प्रतिसाद मिळाला. कामाचं कौतुक झालं. त्यामुळे आनंद मिळाला, अनुभव मिळाला, प्रेरणा मिळाली. पुढच्या वर्षी त्यांनी शंभर मूर्त्या तयार केल्या व बाजार आणि ओळखीच्या माध्यमातून त्यांनी त्यांची विक्री केली. असा व्याप वाढत गेला आज त्या ३०० ते ४०० मूर्ती बनवतात. याकामी त्यांना त्यांचा मुलगा तेजस, सूनबाई मयूरी, मुलगी प्रीती खूप मदत करतात. आवड जोपासण्याचा प्रयत्न केला अन् त्या माध्यमातून अर्थार्जन सुरू झाले.

गणपतीला आकार देताना त्यांना खूप आनंद होतो. गणपतीचे डोळे काढणे, ते रंगविणे ही फार मोठी कला आहे. सौ. शुक्ल तरबेज आहेत. त्यांच्या मैत्रिणी कोणताही मोबदला न घेता खूप मदत करतात. जानेवारीत येणाऱ्या गणेश जयंतीला गणपतीची छोटीशी मूर्ती करून विधिवत पूजा करून शुक्ल यांच्या कामाचा श्रीगणेशा होतो. तो अखेर गणेश स्थापनेपर्यंत चालतो. यावर्षी आनंदाची गोष्ट अशी, की त्यांचे गणपती चक्क दुबईला गेले. एकूण २० गणपती दुबईत पोचले. त्यांच्या परिश्रमाचं चीज झालं. कामाची पावती मिळाली. त्यांच्या कुटुंबाला खूप आनंद झाला. मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहक येतात. आपल्याला आवडणारी मूर्ती बुक करतात. सध्या शुक्ल त्यांच्या छोट्याशा फ्लॅटमध्येच सर्व गणपतीची कामे करतात. चारशे मूर्तिंपैकी एकही मूर्ती शिल्लक राहत नाही. जे जुने ग्राहक आहेत त्यांच्या माध्यमातून व्यवसाय होतो. बाजारात स्टॉल लावायची गरज भासत नाही. त्यांचा मुलगा तेजस खूप होतकरू आहे. छोटासा व्यवसाय मोठा करायचा त्याचा व्यासंग आहे. सध्या महागाईमुळे रंग, माती महाग झाली आहे. शुक्ल मूर्ती पूर्णपणे पंचगव्यापासून बनवतात त्यामुळे मूर्त्या हातोहात खपतात.


‘छंद’ हा नवी उमेद आणि संधी निर्माण करणारा असतो, असे नेहमी म्हटले जाते. मी ही मूर्ती तयार करण्याचा छंद जोपासला अन् तोच छंद आज माझी ओळख बनू पाहत आहे.
-रेखा शुक्ल, मूर्तिकार इंदिरानगर, नाशिक

rekha shukla from Nashik started her own career as a sculptor
मुलींचा जन्मदर घटला; सोनोग्राफी केंद्रांवर ठेवली जाणार नजर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com