कमी बाजारभावामुळे उन्हाळ कांदा साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion stock

कमी बाजारभावामुळे उन्हाळ कांदा साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर

खामखेडा (जि. नाशिक) : सध्या कसमादे भागातील कांदा उत्पादक उन्हाळ कांदा (Summer onion) काढणी व साठवणुकीवर भर देत आहेत. या वर्षी कांद्याची विक्रमी लागवड झाली होती. बंपर उत्पादन मिळेल, अशी आशा असताना, अवकाळी पाऊस, वातावरणातील बदल आणि विजेअभावी कांद्याला मोठा फटका बसला असून, ५० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटणार आहे. सध्या कांद्याला मिळणारा अल्पसा बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवणुकीवर भर देत आहे.

मार्च एडिंगमुळे कांद्याला सरासरी आठशे ते नऊशे रुपये भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी कांदा साठवणूक करीत आहेत. मातीमोल दरात कांदा देण्यापेक्षा साठवण करण्यास अधिक पसंती देत असल्याने सध्या खामखेडासह सावकी, विठेवाडी, पिळकोस, बगडू, भादवण, विसापूर, बागलाण, देवळा व मालेगाव परिसरात कांदा साठवणूक करतानाचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा: Summer Tips: उन्हाळा आलाय, या पाच गोष्टींची काळजी घ्या

मागील वर्षी रोपाच्या टंचाईने कांदा (Onion crop) लागवड कमी होती. उन्हाळी कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. या वर्षी विक्रमी लागवड होऊनही कांद्याच्या उत्पादनात सर्वत्र घट झाली आहे. गिरणा परिसरातील खामखेडा, भऊर, बगडू, पिळकोस, बेज, भादवण, विसापूर या परिसरात उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. दरवर्षी सर्वसाधारण शेतकरी दोनशे ते तीनशे क्विंटल कांद्याची चाळीत साठवणूक करीत होता. मात्र, या वर्षी उत्पादनातील घट, सध्या मिळत असलेला अल्पसा बाजारभाव या गोष्टींचा विचार करून शेतकरी साठवणूक करीत आहेत.

हेही वाचा: Summer Food Tips : उन्हाळ्यात अन्न खराब होतेय! अशी घ्या काळजी

"सध्या अल्पसा बाजारभाव व घटलेल्या उत्पादनामुळे अनेक शेतकरी कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर देत आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे दोन पैसे मिळतील, अशी आशा असल्याने शेतकरी कांद्याची साठवणूक करीत आहे."

-नामदेव बच्छाव, कांदा उत्पादक शेतकरी, खामखेडा

Web Title: Farmers Focus On Summer Onion Storage Due To Low Market Prices Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiksummerOnion Crop