Nashik Cooperative Bank Annual General Meeting
sakal
नाशिक: राज्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना त्याचे पडसाद नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेतही उमटले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, असा ठराव मंजूर करत बँकेच्या सभासदांनी जिल्हा बँकेला आर्थिक पॅकेज देण्याची आग्रही मागणी केली. दरम्यान, सभासदांची तीव्र भावना विचारात घेऊन जिल्हा बॅंकेचे प्रशासक संतोष बिडवई यांनी हा ठराव तातडीने राज्य शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन सभासदांना दिले.