Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला शेतकऱ्यांचा विरोध का? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला शेतकऱ्यांचा विरोध का? वाचा सविस्तर

सिन्नर : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात लोकार्पण होत आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी वावी येथे समृद्धी महामार्गावर काळे झेंडे दाखवत लोकार्पण सोहळ्यास विरोध दर्शवला.

हेही वाचा: Nashik Crime News : बनावट विमान तिकिटे देवून प्रवाशांची फसवणूक

राज्य सरकारने समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण करून उद्घाटन करणे आवश्यक होते. समृद्धीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. शेतांमध्ये जायला रस्ते नाहीत, पावसाचे पाणी थेट शेतांमध्ये शिरते, समृद्धी ठेकेदाराच्या वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. यावर तोडगा काढणे अपेक्षित असताना राज्य सरकारकडून व रस्ते विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या अडचणी दुर्लक्षित करण्यात येत आहेत.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Nashik News : अंगणवाडी सेविकांना पुन्हा देणार मोबाईल?

वारंवार मागणी करूनही प्रश्न सुटत नसल्याने सिन्नर तालुक्यातील वावी येथे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी स्वराज्य पक्ष, छावा संघटना, शेतकरी संघटना आदी संघटनांच्या माध्यमातून एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या समृद्धी लोकार्पण सोहळ्यास विरोध दर्शवला. महामार्गावर येत शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध केला. राज्य सरकार व रस्ते विकास महामंडळाच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.