Farmers Protest
sakal
नाशिक: गळ्यात कांद्याची माळ... ट्रॅक्टरवर बसलेल्या महिला... हाती शेतकरी कर्जमाफीचे फलक अन् बैलगाडी, पायी व चारचाकी वाहतून भरपावसात सोमवारी (ता. १५) जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चाने संपूर्ण नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. अर्थात, निमित्त होते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जनआक्रोश मोर्चाचे.